आयसीसीच्या हॉल ऑफ फेममध्ये राहुल द्रविड

0

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाची एकेकाळी ‘भिंत’ समजल्या जाणाऱ्या राहुल द्रविडचा अखेर आयसीसीच्या ‘हॉल ऑफ फेम’मध्ये अधिकृतरित्या समावेश करण्यात आला आहे. हा सन्मान मिळवणारा राहुल द्रविड हा पाचवा भारतीय खेळाडू ठरला आहे.

बीसीसीआयनं या छोट्याखानी सोहळ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यात माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी द्रविडला कॅप दिली. याआधी बिशनसिंग बेदी, सुनील गावसकर, कपिल देव आणि अनिल कुंबळे या भारतीय खेळाडूंना आयसीसीनं हा सन्मान दिला आहे. या दिग्गजांच्या यादीत आता द्रविडला स्थान मिळालं आहे.