आयसीसी करणार नव्या स्पर्धांचे आयोजन !

0

दुबई: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) येत्या काही काळात नव्या स्पर्धांचे आयोजन करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र त्याची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. आयसीसीकडून २०१३ ते २०३१ या कालावधीत चॅम्पियन्स कपची सुरु करण्याची घोषणा आयसीसीकडून केली जाऊ शकते अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

चॅम्पियन कप ट्वेंटी- 20 आणि एकदिवसीय प्रकारात खेळला जाईल. यामध्ये ट्वेंटी- २० साठी आयसीसी रँकिंगमधील प्रथम दहा संघाचा आणि एकदिवसीय स्पर्धेसाठी प्रथम सहा संघांचा सामना होईल.आयसीसीच्या योजनेनुसार ट्वेंटी- २० चॅम्पियन्स कप २०२४ आणि २०२८ मध्ये होणार असून वन- डे चॅम्पियन्स कप २०२५ आणि २०२९ मध्ये आयोजित करण्याचा आयसीसीचा विचार करत असल्याचे सांगण्यात येत आहे.

तसेच सध्या सुरु असलेल्या दोन विश्वकप स्पर्धा देखील होणार आहे. आयसीसीद्वारे आयोजित करण्यात येणाऱ्या नव्या स्पर्धांशिवाय ट्वेंटी- २० विश्वकप २०२६ मध्ये तर दुसरा विश्वकप २०३० मध्ये होईल. तर वन- डे विश्वकप २०२७ आणि २०३१ मध्ये खेळवला जाईल. त्यामुळे क्रिकेटप्रेमींनना दरवर्षी आयसीसीची मोठी स्पर्धा बघायला मिळणार आहे.