नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) ताज्या कसोटी क्रमवारीमध्ये भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली ९३४ गुणांसह अव्वल स्थानावर कायम असून भारताचा युवा विकेटकीपर ऋषभ पंत आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह सर्वोत्कृष्ठ रँकिंगवर पोहोचले आहेत.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध पर्थमध्ये झालेल्या दुसऱ्या कसोटीत १२३ धावांची खेळी केल्यानंतर विराट कोहलीला १४ गुण मिळाले. त्यामुळे त्याची गुणसंख्या ९३४ झाली आहे. या गुणांसह विराट पहिल्या स्थानावर कायम राहिलाय. दुसऱ्या स्थानावर असलेल्या न्यूझीलंडचा केन विल्यम्सन विराटपासून १९ गुणांनी मागे आहे. विराटच्या आसपास सध्या एकही फलंदाज नाही. पर्थ कसोटीत विजय मिळवून ऑस्ट्रेलियानं ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे.
कसोटीतील “टॉप १०” फलंदाज
१) विराट कोहली (भारत) ९३४ गुण
२) केन विल्यम्सन (न्यूझीलंड) ९१५ गुण
३) स्टीव्ह स्मिथ (ऑस्ट्रेलिया) ८९२ गुण
४) चेतेश्वर पुजारा (भारत) ८१६ गुण
५) जो रूट (इंग्लंड) ८०७ गुण
६) डेव्हिड वॉर्नर (ऑस्ट्रेलिया) ७८७ गुण
७) दिमुथ करुणारत्ने (श्रीलंका) ७५२ गुण
८) डीन एल्गर (दक्षिण आफ्रिका) ७२४ गुण
९) हेनरी निकोल्स (न्यूझीलंड) ७०८ गुण
१०) अझहर अली (पाकिस्तान) ७०८ गुण
कसोटीतील “टॉप १०” गोलंदाज
१) कॅगिसो रबाडा (दक्षिण आफ्रिका) ८८२ गुण
२) जेम्स अंजरसन (इंग्लंड) ८७४ गुण
३) वर्नान फिलेंडर (दक्षिण आफ्रिका) ८२६ गुण
४) मोहम्मद अब्बास (पाकिस्तान) ८२१ गुण
५) रवींद्र जाडेजा (भारत) ७९६ गुण
६) आर. अश्विन (भारत) ७७८ गुण
७) नाथन लियोन (ऑस्ट्रेलिया) ७६६ गुण
८) पॅट कमिन्स (ऑस्ट्रेलिया) ७६१ गुण
९) जोश हेजलहूड (ऑस्ट्रेलिया) ७५८ गुण
१०) यासीर शाह (पाकिस्तान) ७५७ गुणे