बगळूरू । भारत ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेतील दुसर्या सामन्यातील विजयाचे शिल्पकार अश्विन -जडेजा यांचा महत्वाचा वाटा राहिला आहे.भारतीय दोन्ही फिरकी पटू रविचंद्रन अश्विन आणि रविंद्र जडेजा या जोडीने कसोटी विश्वात इतिहास रचला आहे. आयसीसी क्रमवारीत सामाईकरित्या अव्वल स्थान अश्विन-जडेजाला कसोटी गोलंदाजांच्या मिळाले आहे. विश्वात आजपर्यंत एकाच संघातील फिरकीजोडीने कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान प्राप्त केलेले नाही ते भारतीय फिरकीपटून नी पटकविण्याची पहिलीच वेळ आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या बंगळुरू कसोटीत अश्विनने दोन्ही डावात एकूण 8 विकेट्स घेतल्या, तर जडेजाच्या खात्यात 7 विकेट्स जमा झाल्या. बंगळुरू कसोटी सुरू होण्याआधी अश्विन कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर, तर जडेजा दुस़र्या स्थानावर होता. जडेजाने बंगळुरू कसोटीत महत्त्वाच्या क्षणी 63 धावांवर मिळवलेल्या 6 विकेट्सच्या मदतीने तो अव्वल स्थानापर्यंत पोहोचला.
गोलंदाजांनी नंबर एकच्या स्थानावर झेप
याआधी 2008 मध्ये दोन गोलंदाजाना स्थान मिळाले आहे. ते दोन्ही गोलंदाज एकाच संघाचे नव्हते. द.आफ्रिकेचा माजी गोलंदाज डेल स्टेन आणि श्रीलंकेचा फिरकीपटू मुरलीधरन यांना सामाईकरित्या अव्वल स्थान मिळाले होते. पण एकाच संघातील दोन गोलंदाजांनी नंबर एकच्या स्थानावर झेप घेण्याची किमया अश्विन-जडेजाने केली आहे. त्यामुळे हा नवा विक्रम त्यांच्या नावावर नोंदवला गेला आहे. जडेजा-अश्विन यांच्या अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱया डावातील आश्वासक गोलंदाजीने भारतीय संघाने बंगळुरू कसोटी 75 धावांनी जिंकली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत भारताने आता 1-1 अशी बरोबरी साधली आहे. गेल्या वर्षभरातील भारतीय कसोटी संघाची कामगिरी पाहता संघाच्या विजयात अश्विन-जडेजा जोडीचा महत्त्वाचा वाटा राहिला आहे. प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंनीही भारतीय फिरकीजोडीचा धसका घेतल्याचे पाहायला मिळाले. अचूक टप्प्यातील गोलंदाजी आणि फिरकीच्या जोरावर या दोघांकडे प्रतिस्पर्धी संघाला उद्ध्वस्त करण्याची ताकद अश्विन-जडेजा जोडीमध्ये आहे.