आयसीसी रँकिंगमध्ये एबी डिव्हिलियर्स प्रथम

0

दुबई । आयसीसी नुकतेच जाहीर केलेल्या एकदिवसीय रॅकिंगमध्ये भारतीय संघाचे फलंदाजाचा क्रम घसरला आहे.तर दक्षिण आफ्रिकाचा स्टार क्रिकेटपटू एबी डिव्हिलियर्सने फलंदाजीच्या यादीत पहिला क्रमांक पटकाविला आहे.रोहित शर्मा 12 व्या स्थानावर, महेंद्रसिंग धोनी 13 स्थानावर आणि सलामी फंलदाज शिखर धवन याचे स्थान घसरून 15 व्या स्थानावर गेला आहे.तर विराट कोहली भारतीय फलंदाजामध्ये आघाडीवर आहे.

गोलंदाजीमध्ये 11 व्या स्थानी अक्षर पटेल
डिव्हिलियर्सने न्यूझिलंड विरुद्ध सुरू असलेल्या मालिकेत एकूण 262 धावा बनविल्या होत्या. यात वेलिंग्टन येथील तिसर्‍या एकदिवसीय सामन्यात केलेल्या 85 धावांच्या डावाचाही समावेश आहे.आयसीसीकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीनुसार एकदिवसीय सामन्यातील फलंदाजांच्या जागतिक क्रमवारीत एबी डिव्हिलियर्सने ऑस्ट्रेलियाचा सलामी फलंदाज डेव्हिड वॉर्नरला मागे टाकत शीर्ष स्थान मिळविले आहे. या यादीत दुसर्‍या स्थानावर वॉर्नर असून भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली तिसर्‍या स्थानावर आहे. या रॅकिंगमध्ये चौथ्या क्रमांकावर इंग्लंडचा फलंदाज जोए रूटने आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम स्थान मिळविले आहे.

एबी डिविलियर्सचे 875 गुण आहे. आयसीसी रॅकिंगमध्ये वार्नर पेक्षा 4 गुणांनी पुढे आहे. तर विराट कोहलीपेक्षा 23 गुणांनी पुढे आहे.या रॅकिंगसाठी 15 वनडे सामन्याचे प्रदर्शन पाहण्यात आले.33 वर्षीय डिविलियर्स मे 2010 मध्ये पहिले स्थान मिळाले होते.सप्टेंबर 2009 नंतर तो कधीच पहिल्या पाच स्थानावरून घसरला नाही.

आयसीसीच्या एकदिवसीय गोलंदाजीत दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज इमरान ताहिर हा पहिल्या स्थानी आहे. तर दुसर्‍या आणि तिसर्‍या क्रमांकावर अनुक्रमे अफगानिस्तानचा मोहम्मद नाबी आणि श्रीलंकेचा एंजेलो मैथ्यूज यांचा क्रमांक आहे. वेस्टइंडिज विरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत सात गडी बाद करत इंग्लंडच्या क्रिस वोयसे याने पहिल्या दहा गोलंदाजात आपले स्थान निश्‍चित केले आहे. तो या यादीत नवव्या स्थानी आहे.तर अक्षर पटेल हा 11 स्थान प्राप्त केले आहे.