आया ‘बिरज’ का बाँका… संभाल तेरी ‘गगरी’ रे ऽऽऽऽ!

0

जळगाव । येथील वाघनगर परिसरातील ‘साईव्हिजन प्ले स्कूल’मध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त दहिहंडी उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी प्ले स्कूलच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी राधा व श्रीकृष्ण यांची वेषभुषा करुन पारंपारिक ‘दहिहंडी’ बांधून गोप-गोपिकांच्या उपस्थितीत श्रीकृष्णरुपी बालकांच्याहस्ते मनोरा रचुन फोडण्यात आली.

तसेच सामुहिक ‘गोपालकाला’ प्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी चिमुकल्यांनी रासक्रिडा सादर करुन फेरनृत्य सादर करुन उपस्थितांची मने जिंकली. उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी साईव्हिजन प्ले स्कूलच्या संचालिका सौ.व्ही.एस.पाटील यांचेसह शिक्षिका व सेविका तसेच मदतनीस यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमास स्कूलमधील चिमुकल्यांचे पालक प्रतिनिधी उपस्थित होते.