मुलीची अपहरण करणाऱ्यांना तातडीने जेरबंद केल्याने आयुक्तांचा सत्कार

0

पिंपरी : शुक्रवारी चिंचवड परिसरातील क्विन टाऊन सोसायटीमधील माही अवध जैन या मुलीचे अपहरण करण्यात आले होते. हॉटेल व्यवसाय करण्यासाठी आरोपींनी माहीला पळवून नेले. तिच्यासाठी खंडणी मागितली. मात्र पोलिसांनी तातडीने या घटनेची नोंद घेऊन कार्यवाही केली. पोलिसांनी मुलीची बारा तासांच्या आत सुटका केली. या सर्व घटनेतील पोलिसांच्या तत्परतेबद्दल सर्वांनी कौतुक केले. त्यामुळे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष माजी महापौर संजोग वाघेरे-पाटील यांच्या हस्ते पिंपरी-चिंचवड शहराचे पोलीस आयुक्त पद्मनाभन यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी उपमहापौर नगरसेवक राजू मिसाळ, खजिनदार संजय लंके, सरचिटणीस अमोल भोईटे, उपाध्यक्ष दिलीप गोते, बिपीन नाणेकर आदी उपस्थित होते.