जळगाव। कामागार कोर्टाने महापालिकेच्या मृत कर्मर्याची उपदानाची रक्कम देण्याचे आदेश दिल्यानतंरही पैसे दिले नाहीत. यामुळे मंडळ अधिकारी यांच्यासह पथक मनपा आयुक्तांच्या जंगम मालमत्ता जप्तीचे आदेश घेवून आले होते. मात्र, रक्कम लवकरच देण्याचे आश्वासन दिल्यानतंर पथक माघरी गेले व महापालिकेची नामुष्की टळली.
2013 पासून रकमेवर 10 टक्के व्याज
महापालिकेचे बांधकाम विभागातील कर्मचारी निवृत्ती बाबुलाल मोरे यांचा तिन वर्षापूर्वी मृत्यू झाला. त्यांच्या पत्नीला पालिकेकडून नियमाप्रमाणे एक महिन्यात त्यांच्या उपदानाची रक्कम 1 लाख 29 हजार 942 रुपये मिळणे अपेक्षित होते. मात्र, पालिका प्रशासनाने रक्कम न दिल्याने मुक्ताबाई निवृत्ती मोरे यांनी कामागार कोर्टात दावा दाखल केला. त्यांच्यातर्फे अॅड. गजानन जाधव यांनी काम पाहीले. कामागार कोर्टाने महापालिकेला उपदानाची रक्कम देण्याचे आदेश केलेत. तसेच 3 मे 2013 पासून त्यावर 10 टक्के व्याज देण्याचे आदेश दिलेत. आदेशानतंर देखिल रक्कम न दिल्याने जिल्हाधिकारी यांना वुसलीच्या सूचना केल्यात. त्यानुसार तहसिलदार यांनी उपदानाच्या रक्कमेएवडी महपालिका आयुक्तांची जंगम मालमत्ता अटकावून ठेवण्याचे (जप्ती) आदेश दिलेत. त्यानुसार आज गुरुवारी वसुली अधिकारी मिलींद बुवा, तलाठी फिरोज शेख व अॅड.गजानन जाधव आयुक्तांच्या दालनात आले होते.