विरोधकांच्या आरोपांवर दिली प्रतिक्रिया
पिंपरी-चिंचवड : महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव नाही. सत्ताधारी पक्षातील कोणाचाही त्यांच्यावर दबाव नसल्याचे, भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. तसेच पाण्याचे नियोजन करण्यात अपयशी ठरल्याचा ठपकाही त्यांनी प्रशासनावर ठेवला. आयुक्त हर्डीकर हे भाजपचे प्रवक्ते आहेत. भाजपचे घरगडी असल्यासारखे ते काम करतात, असा आरोप मध्यंतरी विरोधकांनी केला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना आमदार लक्ष्मण जगताप बोलत होते.
आयुक्त घरगडी असल्याचे आरोप
महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आपले विश्वासू असलेले नागपूर महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांची पालिकेच्या आयुक्तीपदी वर्णी लावली. त्यामुळे रुजू झालेल्या दिवसापासून हर्डीकर भाजपच्या जवळचे असल्याचे बोलले जाऊ लागले. आयुक्त भाजपला अनुकूल असे निर्णय घेत असून हर्डीकर हे भाजपचे प्रवक्ते आहेत. भाजपचे घरगडी असल्यासारखे ते काम करतात, असा आरोप विरोधकांनी केला होता.
आयुक्त म्हटले होते दबाव आहे
नाशिक फाटा येथील उड्डाणपुलाखाली मोठ्या प्रमाणात अतिक्रण वाढले आहे. अतिक्रमणावर कारवाई करण्याबाबत आयुक्तांना विचारले असता. कारवाई करु नये यासाठी आपल्यावर राजकीय दबाव असल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले होते. याबाबत भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांना विचारले असता ते म्हणाले, हर्डीकर यांच्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव नाही. सत्ताधारी पक्षातील कोणाचाही दबाव नाही
जलपणीर्र् लवकरच काढू
शहराच्या हद्दीतून वाहणार्या पवना आणि इंद्रायणी नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जलपर्णी साचली आहे. त्यामुळे डासांची उत्पत्ती होत असून नागरिकांना त्याचा त्रास होत आहे. विरोधक त्यावरुन आंदोलन करत आहेत. याबाबत विचारले असता जगताप म्हणाले, ’’सामाजिक संस्थांनासोबत घेऊन नद्यातील जलपर्णी काढली जात आहे. यंदा जलपर्णी काढण्यास विलंब झाला आहे. पुढील वर्षी नदीत जलपर्णी साचणार नाही, याची दक्षता घेतली जाईल. पाऊस पडण्याच्या अगोदरच जलपर्णी काढण्यात येईल’’