आयुक्तांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

0

चाळीसगाव । आमदार बच्चु कडू यांच्या वर दाखल गुन्हा मागे घ्यावा व नाशिक महानगरपालिका आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी अपंगांवरील शासकीय निधी खर्च केला नाही करता दप्तर दिरंगाई केल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करावे अशी मागणी चाळीसगाव येथे सामाजिक कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. मागणीचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. 26 जुलै रोजी येथे सामाजिक कार्यकर्ते विवेक रणदिवे, शरद पाटील, जयंत देशमुख, अजय जोशी, रोशन पाटील, शुभम पाटील आदींनी केली आहे.

आमदार बच्चु कडू यांच्यावर कलम 353 नुसार गुन्हा दाखल झाला असून तो मागे घ्यावा नाशिक मनपाने 1995 च्या अपंग पुनर्वसन कायद्याची अंमलबजावणी केली नाही. गेल्या 4 वर्षांपासून आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी अपंगांवरील 3 टक्के राखीव निधी खर्च केला नाही. त्यामुळे अपंग बांधवांवर अन्याय झाला आहे. यास मनपा आयुक्त जबाबदार असून आयुक्त अभिषेक कृष्ण यांच्या वर दप्तर दिरंगाईचा गुन्हा दाखल करावा अन्यथा जिल्हाभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते विवेक रणदिवे, शरद पाटील, अजय जोशी, जयंत देशमुख, रावसाहेब पाटील, रवींद्र सरोदे, रोशन पाटील, शुभम पाटील, प्रमोद पाटील, अजय सूर्यवंशी, मिलिंद पाटील, सुनील पाटील आदी 21 सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे.