पुणे : रॉकफेलर फाउंडेशनने ‘100 रेझिलियंट सिटीज’ या व्यासपीठाच्या सहयोगाने स्थापन केलेल्या ग्लोबल सिटी लीडर अॅडव्हायजरी कमिटीमध्ये आयुक्त कुणाल कुमार यांची निवड झाली आहे.
रेलिझियंट कार्यालय हे विविध सरकारी विभागांतील प्रमुख भागधारकांसमवेत काम करणार आहे. न्यू यॉर्कमध्ये गेल्या महिन्यात झालेल्या 100 रेझिलियंट सिटीज अर्बन रेझिलियन्स’ या परिषदेत ग्लोबल सिटी लीडर ऍडव्हायजरी कमिटी’ची स्थापना झाली. ही सल्लागार समिती सप्टेंबर 2017 मध्ये अथेन्स येथे अथेन्स डेमॉक्रसी फोरम’च्या निमित्ताने पहिल्यांदाच भेटणार आहे. आयुक्त कुणाल कुमार हे या समितीतील भारताचे एकमेव प्रतिनिधी आहेत. पुणे शहर वर्ष 2016 पासून या संस्थेचे काम सुरू आहे. शहरातील विविध प्रश्नांवर ही समिती काम करते. यामध्ये रोगांचा प्रादुर्भाव, भूकंप, किफायतशीर घरांची कमतरता, हवा प्रदूषण, पावसाळ्यातील पूर, दहशतवादी हल्ले आणि पाणी असुरक्षितता आदींचा समावेश आहे.