आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी घेतली मान्सूनपुर्व बैठक

0

जळगाव : आज आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी मान्सून पुर्व आढावा बैठक घेतली. यात आरोग्य विभाग, प्रभाग अधिकारी तसेच वैद्यकीय व दवाखाना विभाग तसेच अग्निशमन व आपत्तीव्यवस्थापन विभागाच्या अधिकार्‍यांना बोलविण्यात आले होते. बैठकीत नाले सफाईबाबत आयुक्तांनी आढावा घेत उर्वरीत नाले त्वरीत सफाई करण्याच्या सुचना दिल्या. यासोबतच पाऊस जोरात पडल्यास नाल्यालगत कोणत्या ठिकाणी पुराचा धोका होवू शकतो याबाबत माहिती जाणून घेतली. तसेच आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या माध्यमातून बचाव पथक, नागरिकांना स्थलांतर करण्याची वेळ आल्यास निवासा बाबत जागेचा तसेच भोजन आदी आवश्यक साहित्य पुरविण्याबाबत सूचना संबधीत अधिकार्‍यांना दिल्या.

साथीच्रा रोगांबाबत उपाररोजनांची माहिती
मेहरुण तलावा लगतचे तांबापूर, मिल्लत हायस्कुल, आंबेडकर नगर, गोपाळपुरा आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यास पुराचा धोका उत्पन्न होत असतो. याठिकाणी बचाव पथक तयार करून त्या परिसरात पथकांतील कर्मचार्‍यांचे नाव मोबाईल नंबर लावण्याच्या तसेच पट्टीचे पोहणार्‍यांचे पथक तयार करण्याच्या सूचना दिल्यात. पावसाळ्यात येणार्‍या साथरोगांबाबत उपाययोजनांची माहिती दवाखाना विभाग, मलेरिया विभागाच्या अधिकार्‍यांकडून आयुक्तांकडून जाणून घेतली. तसेच उपलब्ध औषधांचा स्टॉकची माहिती घेतली. पावसाचे पाणी जंगलातून तसेच मोकळ्या भागातून नाल्यांमधून येत असतांना साप, विंचू आदी प्राणी सरपटाणे प्राणी नागरीवस्तीमध्ये येतात. यावर मनपातर्फे आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत 20-25 सर्पमीत्रांची पथक शहरातील विभागानूसार तयार करावे. त्यांचे नाव व मोबाईल नंबर देखील परिसरात प्रसिध्द करावे. पूरजन्य परिस्थीती निर्माण झाल्यास शहरातील विविध सामाजीक, युवा संघटना तसेच सेवाभावी मदत करण्या संस्थांची मदत मनपा घेवून स्थलांतीर नागरिकांना निवास, जेवण, साहित्य आदीची सुविधा करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. शासनाच्या मालकीचा जरी तलाव असला तरी तलावाची सांभाळ करण्याची मनपाची जबादारी असल्याने महसुल विभागाच्या माध्यमातून गाळ काढण्याचे काम सुरू केले आहे असे आयुक्तांनी सांगितले.