जळगाव । महानगर पालिकेचे आयुक्त जीवन सोनवणे हे आज नियमित सेवेतून निवृत्त झाले. त्यांच्या निवृत्तीनिमित्त महापालिकेतील दुसर्या मजल्यावरील सभागृहात त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. याप्रसंगी महापौर नितीन लढ्ढा, उपमहापौर ललित कोल्हे, स्थायी सभपती वर्षा खडके, महिला व बाल कल्याण समिती सभापती कांचन सोनवणे, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, भाजपाचे मनपा विरोधी पक्ष नेते वामन खडके आदी उपस्थित होते.
आयुक्त जीवन सोनवणे यांनी जळगाव मनपात केलेल्या कार्याची दखल घेत महासभेने त्यांच्या सेवेत वाढ करण्याची विनंती राज्य शासनाला केली होती. मात्र, ती मान्य करता त्यांचा कार्यभार जिल्हाधिकार्यांकडे देण्यात आला आहे. दरम्यान, आयुक्त सोनवणे यांच्या चांगल्या कार्याचा उपयोग करून घेण्यासाठी राज्य शासनाने त्यांची नियुक्ती अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था नाशिक येथे विभागीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात करण्यात आली आहे. ही संस्था नगरपालिका, महानगर पालिका, जिल्हा परीषद, ग्राम पंचायत यांच्या कर्मचार्यांना प्रशिक्षण देण्यात येते. या संस्थेतर्फे 15 प्रकारचे विशेष प्रकल्प तयार करून त्यावर अंमलबजावणी करण्यात येते. या विभागात नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार यांचा समावेश आहे. श्री. सोनवणे विभागीय संचालक म्हणून 3 जुलै रोजी पदभार स्वीकारणार आहेत.