जळगाव । आयुक्त जीवन सोनवणे यांची महापालिकेत 3 जुलै 2016 रोजी नाशिक येथून बदलून आले होते. ते आज सेवा निवृत्त होत आहेत. सोनवणे यांनी त्यांच्या एकवर्षाच्या कार्यकाळात हुडको, अतिक्रमणाचा प्रश्न तसेच कर्मचार्यांची शिरगणती करण्यात आली आहे. त्यांनी दिर्घकाळ प्रलंबित अस्थायी वाहनचालकांना नियमानुसार कायमसेवेत घेतले. तसेच घरकुल कर्जमुक्तीबाबत अभ्यासपूर्ण अपील सरकारकडे मांडल आहे. यासारखे निर्णय घेतले आहेत. त्यांच्या कार्यांची दखल घेत महासभेत त्यांची सेवा वाढविण्याचा ठराव मंजूर करून हा ठराव राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे. सोनवणे यांच्या नंतर महापलिकेत सेवा देण्यास राज्यातील अधिकारी चाचपणी करीत असल्याची चर्चा महापालिकेत होती. यात नाशिक येथील अतिरीक्त आयुक्त किशोर बोर्डे, वरळी येथील नगरपालिका प्रशासन संचालयनाचे ज्वाइंट डायरेक्टर मनोहर हिरे व पुणे महापालिकेचे उपायुक्त प्रकाश बोरसे यांच्या नावांचा समावेश आहे.