आयुध निर्माणीत ‘हॅपेटायटिस बी’ लसीकरण

0

भुसावळ । आयुध निर्माणी येथे आयुध निर्माणी स्थापना दिनाचे औचित्य साधून रुग्णालयात हेपेटाइटिस बी लसीकरण कार्यक्रमाचे आयोजन रुग्णालय समितीतर्फे करण्यात आले आहे.
उद्घाटन निर्माणीचे प्रभारी सोमनाथ त्रिपाठी यांच्या हस्ते सकाळी 10 वाजता करण्यात आले. यावेळी अप्पर महाप्रबंधक एस.बी. पाटील, मुख्य चिकीत्सा अधिकारी डॉ. सुर्यप्रसाद, संयुक्त महाप्रबंधक टी.बी. देशमुख, उपश्रम कल्याण आयुक्त व्ही.एम. सावंत, अधिकारी, जे.सी.एम. कार्यसमिती आणि सर्व युनियनचे पदाधिकारी व आयुध निर्माणीचे कर्मचारी व त्यांचे परिवारातील सदस्य उपस्थित होते.

लसीकरण यशस्वीतेसाठी यांनी घेतले परिश्रम
यावेळी प्रभारी सोमनाथ त्रिपाठी यांनी संबोधीत केले. तसेच सुत्रसंचालन कार्यसमिती सदस्य चेतन चौधरी यांनी केले. आभार आर.आर. पाटील यांनी मानले. डॉ. तुषार राणे यांनी सहकार्य केले. यावेळी कर्मचारी व त्यांच्या परिवारातील सदस्यांनी हेपेटायटिस बी लसीकरणाचा लाभ घेतला. यानंतर मजुरांना सुध्दा लसीकरण करण्यात आले. यशस्वीतेसाठी आयुध निर्माणी रुग्णालय, श्रम कल्याण विभाग, विशाल ठाकुर, विजय सोनार, ईश्‍वर चौधरी, निलेश देवराले, जयसिंग कदम यांनी सहकार्य केले.