आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे आंतरराष्ट्रीय आयुर्वेदावरील परिसंवाद संपन्न
मुंबई – आयुर्वेदाच्या प्रसाराला आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यापक संधी असून आयुर्वेदिक चिकित्सापध्दतीचे प्रमाणिकीकरण करुन संघटनात्मक पध्दतीने प्रचार आाणि प्रसार करणे गरजेचे असल्याचा सूर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे आयोजित इंटरनॅशनल आयुर्वेद या परिसंवादात उमटला. विद्यापीठाचे आंतरराष्ट्रीय शैक्षणिक केंद्रातील अध्यासनामार्फत ’आंतरराष्ट्रीय आयुर्वेद सिम्पोसियम – रेग्युलेटरी अॅक्सेप्टन्स ऑफ ट्रॅडिश़नल कॉम्प्लीमेंटरी अॅण्ड अल्टरनेटीव्ह मेडिसिन या विषयावरील परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादाचे उद्घाटन बिहार व त्रिपुरा राज्याचे माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी व्यासपीठावर मा. कुलगुरु डॉ. दिलीप म्हैसेकर, आयुष विभागाचे संचालक वैद्य राजेश कोटेचा, सेंट्रल कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिनचे अध्यक्ष डॉ. जयंत देवपुजारी, विद्यापीठाचे प्रति-कुलगुरु डॉ. मोहन खामगांवकर, महाराष्ट्र शासनाचे आयुष विभागाचे संचालक वैद्य कुलदीपराज कोहली, विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. श्रीकांत देशमुख, माधवबाग इन्स्टिटयुटचे प्राध्यापक डॉ. जगदिश हिरेमठ, आयुष विभागाचे सल्लागार डॉ. मनोज नेसरी, डॉ. श्रीराम सावरीकर, कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी माजी राज्यपाल डॉ. डी.वाय. पाटील यांनी सांगितले की, आयुर्वेद विद्याशाखेचे महत्व आरोग्य क्षेत्रात महत्वपूर्ण आहे. देशातच नव्हे तर परदेशातही आयुर्वेद पध्दतीची लोकप्रियता मोठया प्रमाणात वाढत आहे. अश्या प्रकारचे आंतरराष्ट्रीय चर्चासत्रामुळे या क्षेत्रातील असणाÚया संधी आणि आव्हाने या विषयांवर उहापोह होईल, असे त्यांनी सांगितले.
विद्यापीठाचे मा. कुलगुरु डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी सांगितले की, आरोग्य शिक्षण क्षेत्रात बदलांचा वेग हा प्रचंड असून त्या दृष्टीकोनातून समाजात परिपूर्ण ज्ञान कसे पोहचेल याबाबत अधिक प्रयत्न करण्याची गरज आहे. याकरीता विद्यापीठाकडून विविध कार्यशाळा व चर्चासत्रांचे आयोजन करण्यात येते. शिक्षणातील गुणवत्ता व कौशल्य वाढीकरीता आंतराष्ट्रीय आयुर्वेद सिम्पोसियमचे सारखे चर्चासत्र महत्वपूर्ण आहेत. आयुर्वेद क्षेत्रात संशोधनाच्या मोठया संधी असून जगभरातही आयुर्वेदाचा प्रचार व प्रसार करण्यात यावा, असे त्यांनी सांगितले.
आयुष विभागाचे संचालक वैद्य राजेश कोटेचा म्हणाले की, आयुर्वेदातील उपचार पध्दती उल्लेखनीय असून त्याचा जगभरात मोठया प्रमाणात वापर करण्यात येतो. पब्लिक हेल्थ प्रोग्रामच्या अनुषंगाने मोठया प्रमाणात आरोग्य सेवा पुरविण्याच्या संधी उपलब्ध आहेत. शिक्षण व प्रशिक्षण यांची संख्या वाढल्यास समाजात आयुर्वेद पध्दतीचा वापर वाढेल.
सेंट्रल कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिनचे अध्यक्ष डॉ. जयंत देवपुजारी म्हणाले, अद्ययावत ज्ञानाचे आदान-प्रदान होणे महत्वपूर्ण आहे. आयुर्वेदामधील संशोधनाला व्यापक संधी आहे मात्र जागतिक स्तरावरील संशोधन पध्दतीप्रमाणे त्याचे डॉक्युमेंटेशन असणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यापीठाचे मा. प्रति-कुलगुरु डॉ. मोहन खामगांवकर यांनी सांगितले की, जीवनशैलीशी निगडीत आजारांचे प्रमाण जगभरात वाढत असून त्यावरील प्रतिबंधासाठी आयुर्वेदातील आहार-विहार आणि उपचारपध्दती उपयुक्त ठरणारी आहे. आयुर्वेदामध्ये गरज असणाÚया क्षेत्रात दर्जेदार संशोधन होणे गरजेचे आहे. विविध ज्ञान शाखांमधील तंत्र व कौशल्य यांचा स्विकार करुन संशोधन करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण म्हणाले, इंटरनॅशनल एज्युकेशन हबतर्फे या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. केंद्र सरकारच्या आयुष विभागाकडून या परिसंवादाकरीता अर्थसाहय्य करण्यात आले. उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी केले.
चर्चासत्रात पहिल्या सत्रात स्कोप अॅण्ड लिमिटेशन ऑफ टेªेनिंग अॅण्ड एज्युकेशन ऑफ आयुर्वेदा या विषयावर आयुष विभागाचे सचिव वैद्य राजेश कोटेचा, सेंट्रल कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिनचे अध्यक्ष डॉ. जयंत देवपुजारी यांनी सहभाग घेतला. या चर्चासत्रात आयुष विभागाचे संचालक वैद्य कुलदीप राज कोहली, ऑल इंडिया इन्स्टिटयुट ऑफ आयुर्वेदाचे डॉ. तनुजा नेसरी, जयपूरचे कंसल्टन्ट फिजिशियन डॉ. माधवसिंह बागेल, फंडेशन डे सल्युडचे संचालक प्रा. जॉर्ज ल्युईस बेरा सहभागी झाले होते. या विषयावरील गटचर्चेत महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिनचे अध्यक्ष डॉ. आशुतोष गुप्ता, इंटरनॅशनल अॅकेडमी ऑफ आयुर्वेदाचे अध्यक्ष डॉ. सुभाष रानडे, बनारस हिंदू युनिव्हर्सिटीचे डॉ. किशोर पटवर्धन, अधिसभा सदस्य डॉ. रागीणी पाटील, डॉ.
जगदिश हिरेमठ, डॉ. महेश कुमार हरीत, अधिष्ठाता डॉ. श्रीकांत देशमुख व डॉ. प्रदीप आवळे यांनी समन्वयन केले. चर्चासत्राच्या दुसऱ्या सत्रात स्कोप ऑफ प्रोफशन अॅण्ड प्रॅक्टिस ऑफ आयुर्वेदा विदिन द रेग्युलेटरी फ्रेमवर्क या विषयावर आयुष विभागाचे सल्लागार डॉ. मनोज नेसरी, अधिसभा सदस्य डॉ. अभय कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. जीवनरेखा आयुर्वेद चिकित्सालयाचे संस्थापक डॉ. मुकूंद सबनीस, आयुर्वेदिक पॉइंटचे संचालक डॉ. ऑन्टोनिओ मोरांडी सहभागी होणार असून गटचर्चेत ऑल इंडिया इन्स्टिटयुट ऑफ आयुर्वेदाचे डॉ. श्रीनिवास आचार्य, डॉ. एस. एन. गुप्ता, इंटरनॅशनल अॅकाडमी ऑफ आयुर्वेदाचे अध्यक्ष डॉ. सुभाष रानडे, सुरज आयुर्वेद सेंटरचे संचालक डॉ. घनश्याम मर्दा, डॉ. डी.वाय. पाटील स्कुल ऑफ आयुर्वेदाचे प्राध्यापिका डॉ.
आश्विनी पाटील, डॉ. अभय कुलकर्णी उपस्थित होते. ए.एस.एस आयुर्वेद महाविद्यालयाचे डॉ. शिशीर पांडे यांनी समन्वयन केले.
चर्चासत्राच्या तिसऱ्या सत्रात रोल ऑफ इंडस्ट्री इन कोलॅबरशन ऑफ रिसर्च इन कॉम्प्लीमेंटरी अॅण्ड अल्टरनेटिव्ह मेडिसिन या विषयावर मा. व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. श्रीराम सावरीकर,यांनी मार्गदर्शन केले. कॅडिला फार्माचे उपाध्यक्ष डॉ. वंदना मोदी, नवी दिल्ली येथील सेंट्रल कौन्सिल फॉर आयुर्वेद रिसर्च सायन्सेसचे संचालक प्रा. वैद्य कर्तारसिंघ धिमन, फॅकल्टी ऑफ अॅग्रीकल्चर अॅण्ड फुड सायन्सेस अधिष्ठाता प्रा. डायना बनाती, माधबागचे ट्रस्टी डॉ. रोहित साने, मा. व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. सुरेश पाटणकर, युनिव्हर्सिटी ऑफ डिब्रेसनचे डॉ. आस्मिता वेले, डॉ. डी. वाय. पाटील स्कुल ऑफ आयुर्वेदाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. विनय पवार सहभागी होते. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचे सल्लागार डॉ. पंकज वांजरखेडकर व वाय.एम.टी. आयुर्वेद कॉलेजच्या प्राध्यापिका डॉ. जाई किनी, डॉ. श्वेता चौधरी यांनी समन्वयन केले. चर्चासत्राच्या अंतीम सत्रात प्रपोज स्ट्रॅटिजी फॉर प्रमोशन ऑफ एज्युकशन, प्रॅक्टीस अॅण्ड रिसर्च इन आयुर्वेदा या विषयावर प्रति-कुलगुरु डॉ. मोहन खामगांवकर, डॉ. श्रीराम सावरीकर यांनी मार्गदर्शन केले. या चर्चासत्रात गटचर्चात फॅकल्टी ऑफ अॅग्रीकल्चर अॅण्ड फुड सायन्सेस अधिष्ठाता प्रा. डायना बनाती, मिनिस्ट्री ऑफ आयुषचे सल्लागार डॉ. मनोज नेसरी, फंडेशन डे सल्युडचे संचालक प्रा. जॉर्ज ल्युईस बेरा, जयपूरचे कंसल्टन्ट फिजिशियन डॉ. माधवसिंह बागेल, डॉ. डी.वाय. पाटील स्कुल ऑफ आयुर्वेदाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. मृदुल चित्रकार, डॉ. अभय पाटणकर, माधवबागचे डॉ. रोहित साने यांनी सहभाग घेतला. विद्यापीठातर्फे नेरुळ (नवी मुंबई) येथील डी. वाय. पाटील स्कुल ऑफ आयुर्वेदा मधील सभागृहात परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. परिसंवादाचा प्रारंभ व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वनाने झाला. विद्यापीठाचे मा. कुलगुरु डॉ. दिलीप म्हैसेकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. विद्यापीठातर्फे आयोजित परिसंवादाचे विद्यापीठाचे संकेतस्थळावरुन थेट प्रक्षेपण करण्यात आले. या आंतरराष्ट्रीय परिसंवादाचा जगभरातील अभ्यासक, शिक्षक व विद्यार्थी यांनी लाभ घेतला. या चर्चासत्रास विद्यापीठाचे प्राधिकरण सदस्य, अधिकारी व आयुर्वेद क्षेत्रातील शिक्षक व प्राध्यापक मोठया संख्येने उपस्थित होते.