आयुर्वेदिक शास्त्राने उपचार केल्यास हृदयासंबंधी रोगनिदान शक्य

0

जळगाव । आधुनिक जीवन हे धकाधकीचे झाले असून वाढत्या स्पर्धेमुळे मानवाल शरिराकडे लक्ष द्यायला सुध्दा वेळे नसल्याचे दिसून येते. धावपळीमुळे शरिराकडे लक्ष न दिल्याने अनेक असाध्य रोग जडत आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे वाढत असलेल्या हद्य विकाराच्या निवारण व प्रतिबंधासाठी आयुर्वेदीक उपचार अत्यंत लाभदायी ठरत आहे. आयुर्वेदीक उपचार केल्यास हद्यासंबंधीचे विकार वेळेवर बरे होऊ शकतात असे शोधनिबंध डॉ.महेश बिर्ला यांनी लंडन येथे नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत सादर केला. इंटरनॅशनल आयुर्वेद अकादमी पुणे यांच्यावीने लंडन येथे 1 ते 3 एप्रिल दरम्यान आंतरराष्ट्रीय आयुर्वेद परिषद आयोजित करण्यात आली होती.

भारत आयुर्वेदाची जननी
परिषदेत सहभागी प्रतिनिधींनी वैद्यकीय क्षेत्रातील विविध उपचार पध्दतीचे शोधनिबंध सादर केले. भारत ही आयुर्वेदाची जननी असून भारतापेक्षा युरोपीय देशांमध्ये आयुर्वेदाचा प्रचार आणि अंगिकार अधिक वेगाने होत असल्याचे डॉ.महेश बिर्ला यांनी शोधनिबंधाद्वारे निदर्शनात आणुन दिले. महत्त्वाचे म्हणजे ज्यांचे शिक्षण अ‍ॅलोपॅथीमध्ये झालेले आहे असे अनेक डॉक्टर पुर्णवेळ प्रॅक्टीस करत असल्याचे दिसून येते.

55 देशांचा सहभाग
लडंन येथे इंटरनॅशनल आयुर्वेद अकादमीच्या वतीने आंतरराष्ट्रीय परिषद घेण्यात आली. या परिषदेत भारतासह 55 देशांचे प्रतिनिधी उपस्थिती होते. या देशातीली 370 वैद्यकिय क्षेत्रातील तज्ज्ञ तसेच प्रतिनिधी सहभागी होते. भारततार्फे डॉ.महेश बिर्ला, आदित्य जैनयांनी प्रतिनिधीत्व केले. परिषदेत सहभागी झालेल्या प्रतिनिधींनी आयुर्वेद चिकित्सेसंदर्भात विविध शोध निबंध सादर केले.

शोध निबंध
या आंतरराष्ट्रीय परिषदेत डॉ.महेश बिर्ला यांनी केस स्टडीसह ‘कोरोनरी अर्थेसी डिसेस अ‍ॅण्ड सक्ससेस आयुर्वेदीक मॅनेजमेंट’ या विषयावर शोधनिबंध सादर केले. डॉ.आदित्य जयंत जहागिरदार यांनी ‘इफेक्ट ऑफ योगा पोस्टर्स, प्रानायम अ‍ॅण्ड योगीक क्रिया अलाँग विद चेंज इन फुड हॅबीट अ‍ॅस मेन्सन इन आयुर्वेदिक फोर’ या विषयावर शोधनिबंध सादर केले. बिर्ला हे हद्यविकारासह विविध आजारांवर मागील 22 वर्षापासून आयुर्वेदीक चिकित्सा पध्दतीने संशोधन व उपचार करत आहे.