मुंबई : आयुष्मान खुरानाच्या पत्नीला कन्सर झाल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वी समोर आले होते. काही दिवसांपूर्वी ताहिराने तिची प्रकृती बरी झाल्याचे सांगितले होते. तिच्यावर पहिली केमोथेरपी करण्यात आली आहे.
ताहीराने एक फोटो शेअर करत भावनिक कॅप्शनही दिले आहे, ‘कधीच वाटलं नव्हतं की मी मला पूर्ण बाल्ड व्हावं लागेल. अशा रुपात सर्वांसमोर येण्यासाठी खूप हिंमत लागते. मात्र, हे एक असं माध्यम आहे, जिथे तुम्ही स्वत:ला व्यक्त करू शकता’, असे लिहित ताहीराने फोटो शेअर केला आहे.