आयुष्यमान खुराणाच्या चित्रपटाचे १०० कोटी पक्के ‘बधाई हो’ !

0

मुंबई : ‘बधाई हो’ या एका चित्रपटाने आयुष्यमान खुराणा बॉलिवूडचा ए लिस्ट स्टार बनला आहे. ‘बधाई हो’च्या पहिल्या वीकेंडची कमाई बघता, लवकरच हा चित्रपट १०० कोटींचा आकडा पार करणार, असे दिसतेय.

‘बधाई हो’ हा एका वेगळ्या विषयाला वाहिलेला चित्रपट आहे. नातवंडांना खेळवण्याच्या वयात आयुष्यमानची आई प्रेग्नंट राहते आणि ही गोष्ट जगापासून लपवता लपवता आयुष्यमान रडकुंडीला येतो, अशी याची कथा आहे. मजेदार अंदाजातील ही कथा प्रेक्षकांना प्रचंड भावली आहे. आयुष्मान खुराणा सोबत नीना गुप्ता, सान्या मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहेत.