आयुष्यमान भारत योजनेमुळे १० लाख नोकऱ्या निर्माण होणार

0

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्वाकांक्षी आयुष्यमान भारत योजनेमुळे आरोग्य आणि विमा क्षेत्रातील 10 लाख निर्माण होणार असल्याचे सांगण्यात येत आहे

इंडस्ट्रियल बॉडी असोचेमने आयोजित कार्यक्रमाला संबोधित करताना प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी इंदु भूषण यांनी सार्वजनिक सेवांमध्ये आरोग्य सेवांची गुणवत्ता सुधारण्यास तसेच खाजगी क्षेत्रामध्ये गुणवत्ता सुधारणार असल्याचे सांगितले. यावेळी भूषण यांनी या योजनेमुळे आरोग्य आणि विमा क्षेत्रात १० लाख नवीन नोकऱ्या निर्माण होतील असे सांगितले.

पंतप्रधान जनआरोग्य योजना (आयुष्यमान भारत) अंतर्गत ५ लाखापर्यंतचे उपचार होणार आहे. १० कोटी कुटुंबाना याचा लाभ होणार आहे.