तळोदा । केंद्र शासनातर्फे आयुष्यमान योजना सुरु करण्यात येत असून या योजनेअंतर्गत 50 कोटी लोकांसाठी ह्या योजनेचा लाभ मिळणार आहे, याचे नियोजन करण्यात येणार आहे. 10 कोटी कुटूंबाला या योजनेत समावेश केला जाणार असून या योजनेअंतर्गत 5 लाख रुपयांपर्यंत लाभार्थी कुटूंबाला मदत केली जाणार आहे. या योजनेचे कार्ड बनवून घेण्याचे आवाहन खासदार हिना गावीत यांनी केले. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य अभियान अंतर्गत दंत व सर्व रोग निदान शिबीराचे उदघाटन झाले यावेळी त्या बोलत होत्या. रुग्णांची तपासणी व रोगावर उपचार शिबिरा अंतर्गत केले जाणार आहे. म्हणून जास्तीतजास्त रुग्णांनी शिबिराचा फायदा करुन घ्यावा, असे ही त्या म्हणाल्या.
दंत व रोग निदान शिबिराचे आयोजन
दंंत व सर्व रोग निदान शिबीर उपजिल्हा रुग्णालय येथे आयोजित करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर आमदार विजयकुमार गावीत, नगराध्यक्ष अजय परदेशी, उप नगराध्यक्षा भाग्यश्री चौधरी, नपाचे आरोग्य सभापती सुनयना उदासी, भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्रसिह राजपूत, गट विकास अधिकारी शरद मगर, रुपसिंग पाडवी,जिल्हा निवासी वैद्यकीय अधीकारी डॉ शरद काळे, उपजिल्हा रूग्णालयाचे अधीक्षक डॉ विजय पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ महेंद्र चव्हाण, नगरसेवक अम्मांनुदिन शेख, भाजपाचे डॉ स्वप्निल बैसाणे आदी उपस्थित होते. या शिबिरात स्त्री रोग, जनरल फिजिशियन, दंत रोग, कान नाक, घसा, त्वचा रोग, नेत्र रोग, मानस रोग, बाल रोग, अस्थी रोग आदी रोगांवर चिकित्सा करण्यात आली. या शिबिरात स्त्री रोग या करिता डॉ विजय पाटील व डॉ जे सी फुले, नाक कान घसा तज्ञ डॉ राजेश कोळी, दंत चिकित्सक डॉ वेणीलाल चौधरी, डॉ अविनाश गव्हाणे, त्वचा रोग चिकित्सक डॉ प्रिती पाडवी, नेत्र रोग तज्ञ डॉ नरेंद खेडकर, डॉ गावीत, भूल तज्ञ डॉ राहुल वसावे, डॉ वंदना सोनवणे, बालरोग तज्ञ डॉ रणजित पावरा, डॉ पाटील, अस्थी रोग तज्ञ डॉ संजय गावीत, मानस रोग तज्ञ डॉ वंदना सोनवणे व सर्जन डॉ राजेश वसावे डॉ रोहित वसावे यांनी शिबिरात रुग्णांची तपासणी केली. शिबीराचे संयोजन उपजिल्हा रुग्णालयचे वैद्यकीय अधिक्षक डॉ विजय पाटील व तालुका आरोग्य अधिकारी डॉ महेंद्र चव्हाण यांनी केले.