आयुष्याला गँगरीन होणार नाही याची काळजी घ्या

0

बारामती । अज्ञानापोटी व आकर्षणापोटी आपला पाय एखाद्या क्षणी घसरेल, त्याचवेळी आयुष्याला गँगरीन होण्याला प्रारमभ होईल. तेव्हा युवतींनो, आयुष्याला गँगरीन होणार नाही, याची काळजी घ्या, असे आवाहन उपविभागीय पोलिस अधिकारी बापू बांगर यांनी शारदानगर येथे केले.

अ‍ॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या वतीने शारदानगर शैक्षणिक संकुलातील विद्यार्थिनींसाठी निर्भय अभियानाअंतर्गत आयोजित व्याख्यानात बांगर बोलत होते. ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार, सहायक निरीक्षक बेरड, फौजदार वर्षा जगदाळे, महाविद्यालयाचे प्राचार्य आर, बी. देशमुख, उपप्राचार्य एस.एस. होनमुटे, निर्भया पथकातील पोलिस नाईक अमृता भोईटे आदी या वेळी उपस्थित होते. जेव्हा आयुष्याच्या एका वेगळ्या वाटेवर विद्यार्थिनी येतात, तेव्हा आपल्या आईला मैत्रीण मानण्याची तीच वेळ असते. तिच्याशी मनमोकळेपणाने बोला. सावध रहा. अनोळखी व्यक्तींवर पटकन विश्‍वास ठेवू नका. आपण वेळीच दक्षता घेतली तर कोणीही आपल्याला फसवू शकणार नाही. किंवा आपला विश्‍वासघात करू शकणार नाही, असे बांगर यांनी सांगितले. राजेंद्र पवार म्हणाले, मोबाईलपासून दूर राहण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी करावा, असे पवार यांनी सांगितले. प्रा. ज्योती जोशी यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. अरूण पुरी यांनी आभार मानले.