जळगाव । येथील आर.आर. विद्यालयात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र गुणवत्ता विकास कार्यक्रम अंतर्गत क्रिडा स्पर्धा, कला, विज्ञान, गणित इंग्रजी, शैक्षणिक साहित्य प्रदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक डी.एस. सरोदे तर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे एल. झेड. कोल्हे माजी कलाशिक्षक व डॉ. दिलीप राणे, प्रसिध्द स्त्रीरोग तज्ज्ञ हे उपस्थित होते.
साहित्य प्रदर्शनात विविध विषयावर रेखाटली चित्रे
कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात येवून राष्ट्रीय खेळाडू तेजस्विनी जाधव हिने मशाल प्रज्वलन केले. यानंतर दिपप्रज्वलन व सरस्वती पूजन करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या उपमुख्याध्यापिका विजया काबरा यांनी केले. तर पाहुण्यांचा परिचय कलाशिक्षक अरुण सपकाळे यांनी करुन दिला. पाहुण्यांचा सत्कार मुख्याध्यापक यांनी शाल, पुष्पगुच्छ देवून केला. सदर प्रदर्शनात वस्तूचित्र, संकल्प चित्रे, स्मरणचित्रे, कार्टून चित्रे, निसर्ग देखावे, पेन्सील शेडींग, मुक्तहस्त चित्रे, कोलाज चित्रे, वारली चित्रे, कथा चित्रे आदींसह इंग्रजी, गणित हस्तलिखित चित्रे, तक्ते तसेच हतनूर धरणाच्या पाण्याचा योग्य वापर, अंतराळ वस्ती, पवन ऊर्जा, सौरऊर्जा, स्मार्ट सिटी, घराची सफाई करणारा, रोबोट, हायड्रोलीक, क्रेन, खारन्या पाण्यापासून उर्जा निर्मिती, पॉली हाऊस, कचर्याचे व्यवस्थापन आदी विषयांसह सुमारे १९७० वस्तू व ८४० चित्रे तसेच याप्रसंगी आंतरवर्गीय क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्यात. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडाशिक्षक सौ. विद्या कलंत्री यांनी केले तर आभार सौ. अपर्णा पाटील यांनी मानले. याप्रसंगी व्यासपीठावर पर्यवेक्षक एस.बी.अत्तरदे, प्रतिमा याज्ञिक, आर. एम. झंवर जयांशु पोळ, के.पी. माळी, बी.बी. तायडे, के.पी. माळी, एस.डी.पाटील, ए.एन.पाटील आदी उपस्थित होते.