जळगाव । बायोमेट्रीक व आरएफआयडी या नव्या यंत्रामुळे गस्तीत पोलीस दिसतील व पोलिसांची गस्त सुरु राहिली तर दरारा कायम राहतो, आरएफआयडी यंत्रणेमुळे पोलिस दलातील अलर्टनेस वाढेल आणि नागरीकांना आनंदासह सुरक्षेची खात्री होईल. मात्र अशा यंत्राच्या माध्यमातून पोलिसांवरच नियंत्रण ठेवण्याची वेळ का आला? याचाच अर्थ काही तरी गडबड आहे असा प्रश्न राज्याचे महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आरएफआयडी पेट्रोलिंग सिस्टीमच्या लोकार्पणप्रसंगी उपस्थित केला.
उद्घाटन सोहळ्यात यांची होती उपस्थिती
जिल्हा पोलिसदलातर्फे कार्यान्वीत करण्यात आलेल्या अत्याधुनीक आरएफआयडी यंत्रणच्या यशस्वी प्रयोगानंतर आज पालकमंत्री चंद्रकात पाटील यांच्या हस्ते शहरातील सर्व सहा पोलिस ठाण्या अंतर्गत या यंत्रणेचे उदघाटन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पोलिस मुख्यालयाच्या मंगलम सभागृहात आयोजीत या कार्यक्रमात व्यासपीठावर जलसंपदा तथा वैद्यकिय शिक्षण मंत्री गिरीश महाजन, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, खासदार ए.टी. पाटील, आमदार सुरेश भोळे,आमदार स्मिता वाघ, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे, अपर पोलीस अधीक्षक बच्चन सिंह, चाळीसगाव परिमंडळाचे अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपअधीक्षक सचिन सांगळे उपस्थित होते. प्रारंभी पोलीस अधीक्षक कार्यालयात 1823 पासून बदलत्या पोलीस दलाच्या चित्रांचे उद्घाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी प्रास्ताविक केले.
मी म्हणून स्वत:कडे बघा
पूर्वीच्या काळी शत्रूशी लढायला सैन्य होते, मात्र स्वत:वर लक्ष ठेवायला पोलीस नव्हते. तेव्हा माणूस स्वत:च स्वत:कडे लक्ष ठेवत होते. आता सरकार आपल्याला कामाचा मोबदला देतो, त्यामुळे ते काम केलेच पाहिजे दुसजयाने आपल्यावर नियंत्रण ठेवण्याचा गरजच नाही. त्यासाठी मीच माझ्या कामावर लक्ष ठेवतो अशी भावना निर्माण झाली पाहिजे, असे मत पालकमंत्र्यांनी व्यक्त केले.
सिस्टीम राज्यात प्रथमच सुरु
जिल्ह्याला लाभलेले जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर व जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे हे दोन्ही अधिकारी कल्पक व कर्तव्यदक्ष असल्याचे गौरवोद्गार पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी काढले. दोन्ही अधिकाजयांनी स्वत:ला कामात झोकून दिले आहे. कराळे यांनी सुरु केलेली आरएफआयडी पेट्रोलिंग सिस्टीम राज्यात प्रथमच सुरु झाली आहे.