आरएसएस बदनामी खटला : राहुल गांधींवर आरोप निश्‍चित

0

भिवंडी । काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी 2014 मध्ये भिवंडीमधील एका सभेत महात्मा गांधींच्या हत्येसाठी आरएसएस हे जबाबदार असल्याचा आरोप केला होता. यानंतर राहुल गांधींवर संघाच्या भिवंडी शाखेचे सचिव राजेश कुंटे यांनी अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला होता. मुंबई-राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) मानहानी केसमध्ये राहुल गांधींवर मंगळवार ठाणे जिल्ह्यातील भिवंडी कोर्टात आरोप निश्‍चित झाले आहेत. राहुल सकाळीच कोर्टात हजर झाले होते. मंगळवारी सकाळी मुंबई विमानतळावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी राहुल गांधींचे जोरदार स्वागत केले. राहुल गांधींनी भिवंडी येथील सभेत आरएसएसवर गंभीर आरोप केला होता. महात्मा गांधींच्या हत्येसाठी संघ जबाबदार असल्याचा आरोप राहुल यांनी केला होता. त्यानंतर संघाच्या भिवंडी शाखेच्या सचिवाने त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. या खटल्याची पुढील सुनावणी 10 ऑगस्टला होणार आहे.

राहुल गांधींनी मार्च 2014 मध्ये महाराष्ट्रातील भिवंडी येथे काँग्रेसच्या प्रचारसभेत संघाविरोधात वक्तव्य केले होते. राहुल यांनी आपल्या भाषणात म्हटले होते, की 1948 मध्ये महात्मा गांधींची हत्या झाली, याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघच जबाबदार होता. राहुल गांधींवर संघाच्या भिवंडी शाखेच्या राजेश कुंटे यांनी केस दाखल केली होती. कुंटे म्हणाले होते, की राहुल गांधींच्या वक्तव्याने संघाच्या प्रतिमेला धक्का लागला आहे. या खटल्याच्या पहिल्या सुनावणीनंतर संघाचे वकिल म्हणाले होते, गांधी हत्येसाठी संघाला जबाबदार धरणारे वक्तव्य जर काँग्रेस नेत्यांनी सार्वजनिक रित्या मागे घेतले तर खटला मागे घेतला जाऊ शकतो.