नवापूर। तालुक्यातील मौजे नवागाव ग्रामपंचायत तर्फे पेसा 5 टक्के निधी अंतर्गत आरओ जलशुध्दीकरण प्रकल्पाचे उद्घाटन जि.प अध्यक्षा रजनीताई नाईक यांच्या हस्ते झाले. यावेळी पं.स सभापती सविता गावीत, जि.प सदस्या मालती नाईक, आदिवासी सहकारी साखर कारखान्याचे संचालक बाळु नाईक, छगन वसावे, शेतकी संघाचे सभापती अजित नाईक कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन दिपक नाईक, सरपंच शर्मिला नाईक, माजी सरपंच प्रकाश नाईक, गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, विस्तार अधिकारी किरण गावीत आदी उपस्थित होते.
50 पैसे प्रतिलिटरने मिळणार पाणी
सदर प्रकल्प सात लाख पन्नास हजार रुपयाचा आहे. प्रति तास दोन हजार लीटर शुध्दपाणी गावाला मिळणार आहे. मोबाईल सारखे रिचार्ज ए.टी.एम सिस्टम आहे. 50पैसे लिटर प्रमाणे 20 लिटर ला 10 रुपये आहे. लग्न व इतर कार्यक्रमासाठी थम्सची सुविधा केली आहे. पुढील वर्षा मध्ये डोकारे व सुकवेल येथे आर ओ प्रकल्प सुरु करणार असल्याची माहिती नाईक यांनी दिली. गटविकास अधिकारी वाळेकर म्हणाले की 80 टक्के आजार हे पाण्यामुळे होत असतात. पाण्याचे नमुने तपासणीची सोय नवापुर तालुक्यात झाली आहे. पाण्याचे स्तोञ 1 हजार 976 आहेत. संचलन उमराण गावांचे सरपंच गोरजी गावीत यांनी केले तर आभार ग्रामविकास अधिकारी बी.डी देवरे यांनी मानले.