शिंदखेडा । शिंदखेडा नगरपंचायतीची होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी सदस्य पदांच्या आरक्षणाची सोडत काढण्यासाठी नगरपंचायतीच्या कार्यालयात बैठक होत आहे. सकाळी 11 वा.बोलावण्यात आलेल्या या बैठकित अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती महिला,नागरीकांचा मागास प्रवर्ग व त्यामधील महिला,सर्वसाधारण प्रवर्गातील महिला यांचे आरक्षण निश्चित करण्यात येणार आहे. शिंदखेडा नगरपंचायत 2012 मध्ये अस्तित्वात आली होती. या नगरपंचायतीची दुसरी पंचवार्षीक निवडणूक नोव्हेंबर -डिसेंबरमध्ये होऊ घातली आहे.
सतरा प्रभागांसाठी असेल सोडत
या निवडणूकिच्या प्रभाग रचना व आरक्षण सोडतीच्या कार्यक्रमास 7 जुलैपासून सुरूवात झाली आहे.आज 20जुलै रोजी सदस्य पदांच्या आरक्षणाची सोडत होत आहे. ही सोडत सन 2011च्या जनसंख्येच्या आधारावर करण्यात येणार आहे.सतरा प्रभागांसाठी हि सोडत काढण्यात येत आहे. दि.24 जुलै रोजी प्रारूप प्रभाग रचना आरक्षणाची माहिती नागरीकांच्या माहितीसाठी लावण्यात येणार आहे.यावर हरकती व सूचना 31जुलै पर्यंत नोंदविता येणार आहेत. हरकतींवर 5 ऑगष्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी होणार आहे. अंतीम प्रभाग रचनेस 11 ऑगष्ट रोजी विभागिय आयुक्तांकडून मान्यता देण्यात येणार आहे. या आरक्षण सोडतीच्या बैठकिस उपस्थित राहावे असे आवाहन मुख्याधिकारी अजित निकत यांनी केले आहे.आरक्षणानंतर इच्छुकांना निवडणूक लढविता येणार किंवा नाहि हे स्षष्ट होईल. सद्यस्थितीत नगर पंचायतीचे चार प्रभाग असून 17 सदस्य आहेत व दोन स्विकृत नगर सेवक अशी एकूण 19 सदस्य संख्या आहे.नव्याने होत असलेल्या रचनेत एक सदस्य एक प्रभाग अशी रचना आहे.