आरक्षणाप्रश्नी आंदोलन:अण्णा हजारे

0
नगर : आरक्षणाच्या विरोधात आपण आंदोलन करणार असल्याच्या सोशल मीडियात पसरत असलेल्या बातम्या खोट्या आहेत. या विषयाच्या समर्थनार्थ अगर विरोधातही आपण कधी बोललो नाही. मात्र, हा विषय आता संवेदनशील झाल्याने तो सामोपचाराने सोडविणे आवश्यक आहे,’ असे सष्टीकरण ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिले आहे.

सोशल मीडियात फिरत असलेल्या बातम्यांसंबंधी हजारे यांनी प्रसिद्धपत्रकाद्वारे आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, ‘आरक्षणाच्या विरोधात किंवा आरक्षणाच्या समर्थनार्थ मी कधीही कोणतेही वक्तव्य केलेले नाही. येत्या सहा सप्टेंबर रोजी मी आरक्षणाच्या विरोधात आंदोलन करणार असल्याच्या बातम्या पूर्णतः खोट्या असून, जाणीवपूर्वक पसरवण्यात येत आहेत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानानुसार समता निर्माण व्हावी, या हेतूने आरक्षणाची तरतूद केली. समतेसाठी आरक्षण  असणे आवश्यकही आहे. असे म्हणत हजारे आंदोलन छेडनार असल्याचे  सष्टीकरण  दिले  आहे .