आरक्षणाबाबत महाविकास आघाडी सरकारला गांभीर्यच नाही – खा. उन्मेश पाटील

जळगाव – तत्कालीन भाजपा सरकारने मराठा समाजाला आरक्षण देऊन त्यांना न्याय मिळवुन दिला होता. मात्र राज्यात सत्तांतर झाल्यानंतर हे आरक्षण टिकविण्याची जबाबदारी महाविकास आघाडी सरकारची होती. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता हे आरक्षण दिले गेले पाहिजे. सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यात महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरल्यामुळेच हे आरक्षण रद्द झाले आहे. मुळात आरक्षणाबाबत महाविकास आघाडी सरकारला कुठलेही गांभीर्यच नसल्याची प्रतिक्रिया भाजपाचे खासदार उन्मेश पाटील यांनी दिली आहे.