चोपड्यात गोंधळाचा कार्यक्रम; धनगर, धनगड एक असूनही आरक्षण देण्यास टाळाटाळ होत असल्याचा आरोप
विविध ठिकाणी रास्ता रोकोसह निदर्शने; प्रशासनाला मागण्यांचे निवेदन
जळगाव- आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज बांधवांतर्फे आज जिल्हाभरात ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलनासह निदर्शने करण्यात आली. विविध मागण्यांचे प्रशासनास निवेदन देण्यात आली आले. धनगर समाजसर्व राज्यांमघ्ये अनुसूचित जमाती(एस टी) संर्वगात असून राज्याच्या सुचीत धनगर ऐवजी धनगड झाल्याने सर्व समाज वंचित राहीला आहे, धनगर व धनगड राज्यात एकच असल्याचे पुरावे समोर येवूनही समाजास (एस टी)आरक्षण दिले जात नसल्याचे आंदोलनकर्त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, चोपड्यात प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी गोंधळाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
पहुरला तासभर वाहतूक ठप्प
पहूर-येथील जळगांव औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावर धनगर समाज संघर्ष समिती जळगांव व सकल धनगर समाजातर्फे सोमवारी सकाळी 9 वाजेच्या सुमारास छत्रपती शिवाजी बसस्थानक चौकात धनगर समाजाला अनुसुचित जमातीचे आरक्षण मिळावे, सोलापूर विद्यापीठास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नांव दयावे या मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आहिल्या देवी होळकर यांच्या पुण्यतिथी निमित्त हे आंदोलना करण्यात आले. यावेळी शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य राजधर पांढरे, माजी पंचायत समिती सभापती बाबुराव घोंगडे, सरपंच निताताई पाटील, राजू पाटील, अॅड. एस. आर. पाटील, अरुण घोलप, शैलेश पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले. शासनाविरुद्ध धनगर समाज एकवटला असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगीतले यावेळी मंडळ अधिकारी प्रशांत निंबोळकर यांना महिलांनी निवेदन दिले.
पहुरला यांचा होता सहभाग
पहूर शेंदूर्णी, पाळधी, तोंडापुर, वाकोद, पिंपळगाव, हिवरी, हिवरखेडा, वडाळी, जांभूळ, शेरी आदी गावातून समजा बांधव उपस्थित होते. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य अमीत देशमुख, माजी जिल्हा परिषद सदस्या शिला पांढरे, वंदना सावळे, शाम सावळे, समाधान पाटील, अरविंद देशमुख, भास्कर पाटील, मीनाताई पाटील, विजय पांढरे, साहेबराव देशमुख, संजय देशमुख, शरद पांढरे, कालींदीबाई घोलप, दिपाली बेढे आदी उपस्थित होते. संघर्ष समितीचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख रामेश्वर पाटील यांनी सुत्रसंचालन केले. गणेश पांढरे यांनी आभार मानले. घोषणा देत सरकारचा निषेध करण्यात आला. चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ठप्प झालेली वाहतूक तासाभरानंतर सुरळीत झाली.
एरंडोल येथे धरणे आंदोलन.
एरंडोल- आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाजाच्या वतीने तहसीलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार सी.बी.देवराज व पोलीस निरीक्षक देविदास पवार याना समाजाच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. धरणे आंदोलन शांततेत पार पडले. धनगर समाजाला आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी धरणगाव चौफुली येथुन समाज बांधवांचा मोर्चा काढण्यात आला. निवेदनात म्हटले आहे की आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज अनेक वर्षापासून संघर्ष करीत आहे. मात्र शासनाने समाजाच्या मागणी कडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. घटनेत 1982 च्या जातनिहाय यादीत धनगर समाजाचा अनुक्रम क्रमांक 36 वर समावेश असतांना देखील समाजाला सवलतींपासून वंचित ठेऊन शासन समाजावर अन्याय करीत असल्याचे म्हटले आहे. यावेळी डॉ.प्रवीण चंद्रभान वाघ,चंद्रकांत पारखे,कृष्णा धनगर,आनंदा धनगर,वामन धनगर,नवल धनगर,राजेंद्र धनगर,गोविंदा धनगर,कैलास धनगर,युवराज धनगर यांचेसह समाज बांधव मोठ्या संख्यने उपस्थित होते.
चोपडा येथे धनगर समाज एकवटला
चोपडा – चोपडा तालुका धनगर समाजाच्या वत्तीने तहसील कचेरीच्या आवारात सकाळी 11 ते 05 वाजेपर्यंत ठिय्या अंदोलन करण्यात आले व शासनाचे लक्ष वेधण्यासाठी गोंधळ जागरणचा कार्यक्रम करण्यात आला. नायब तहसीलदर पेंढारकर, पी. आय. किसनराव नजनपाटील यांना देण्यात आले. समाजातील पं स सभापती आत्माराम म्हाळके, नगरसेवक महेंद्र धनगर, डॉ नरेंद्र शिरसाठ, नगरसेविका सरला शिरसाठ, भगवान नायदे, शामभाऊ धामोळे, नंदकिशोर सांगोरे, गोपाल धनगर, देविदास धनगर, मधुकर धनगर, योगेश कंखरे, सुनिल बागुले, अरुण कंखरे, दत्तु गुरुजी, आर. सी. भालेराव, नरेन्द्र धनगर, सचिन धनगर, पी. के. नायदेंसह अंदोलनासाठी तालुक्यातील शेकडो समाज बांधव, महीला उपस्थीत होते. धनगर समाजाच्या ठिय्या अंदोलनला विधानसभा माजी सभापती अरुणभाई गुजराथी, आमदार चंद्रकांत सोनवणे, कांग्रेसचे माजी नगरध्यक्ष संदिप भैय्या पाटील, माजी आमदार कैलास पाटील, नगरध्यक्षा मनिषा चौधरी, उपनगरध्यक्षा सुप्रिया सनेर, जि प सदस्य गजेन्द्र सोनवणे, उपसभापती एम. व्ही. पाटील, कांग्रेसचे शहरध्यक्ष राजाराम पाटील, शिवसेनेचे नगरसेवक किशोर चौधरी, राजाराम पाटील, विकास पाटील, आबा देशमुख, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संजिव सोनवणे, आर पी आयचे गोपाल सोनवणे, संतोष अहीरे, चोसाका माजी संचालक अशोक पाटील, भाजपाचे प्रदिप पाटील, मगन बाविस्कर, देवेंद्र सोनवणे यांच्यासह विविध सामाजिक संघटना तसेच राजकीय पक्षाचे पदाधिकारीनी उपस्थित होते.
अॅड. ललिता पाटील यांचा सहभाग
अमळनेर– धुळे तालुक्यातील फागने धनगर समाज आरक्षण आंदोलनास पाठिंबा देऊन काँगे्रेसच्या सरचिटणीस तथा जिजाऊ बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा अॅड ललिता पाटील या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. धनगर, मराठा, मुस्लिम समाजाला आरक्षण मिळायलाच पाहिजे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
जामनेरात रास्ता रोको
जामनेर- आरक्षणासाठी धननगर समाजातर्फे जामनेरात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी नायब तहसीलदार दिनकर पाटील व पोलिस निरीक्षक प्रतापसिंह शिकारे यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.