आरक्षणासाठी मराठा समाज रस्त्यावर

0

भुसावळ  । आपल्या विविध मागण्यांसाठी नाहाटा चौफुलीसमोर रास्तारोको व चक्काजाम आंदोलन करण्यात आले. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी समाजातर्फे वर्षभरापासून शिस्तबध्द मोर्चे काढण्यात आले. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, कोपर्डी प्रकरण जलद गती न्यालयालयात चालवावे या मागण्यांविषयी सरकारने गांभिर्याने विचार केला नसल्याने प्रखर आंदोलन करण्यात आले आहे. तसेच महामार्गावरील दुतर्फा वाहतूक ठप्प झाल्याने रहदारीस अडथळा निर्माण झाला त्यामुळे पोलिसांनी कार्यकर्त्यांना गाडीत बसवून पोलीस स्टेशनला आणले.

यावेळी आंदोलकांवर गुन्हे दाखल करुन त्यांची सुटका करण्यात आली. याप्रसंगी नरेंद्र पाटील, प्रताप पाटील, राजेंद्र आवटे, राजेंद्र चौधरी यांनी मार्गदर्शन केले. यशस्वीतेसाठी संजय कदम, महेंद्र ठाकरे, ईश्‍वर पवार, कृष्णा शिंदे, अशोक पाटील, राजू देवपुजे, नरेश पाटील, प्रमोद पाटील, अशोक हिंगणे, गौरव आवटे, राजू आवटे, राजेंद्र चौधरी, रविंद्र लेकुरवाळे, रवी ढगे, पिंटू भनगाळे यांनी परिश्रम घेतले.

मुक्ताईनगरात चक्काजाम शांततेत
तालुक्यातील सकल मराठा समाजावतीने सकाळी 10 वाजता कोपर्डी प्रकरणाच्या निषेधार्थ व आरक्षणाच्या मागणी संदर्भात आशिया महामार्ग क्र.46 वर चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यावेळी तालुका सकल मराठा समाजाच्या सहभागी सर्वपक्षीय नेते व कार्यकर्त्यांनी कोणतीही घोषना न देता अगदी शांततेत शिस्तबद्धरीत्या तब्बल एक तास चक्काजाम आंदोलन केले. याबाबतचे लेखी निवेदन नायब तहसिलदार शांताराम चौधरी दिले व आंदोलनाची सांगता करण्यात आली. प्रसंगी पोलिस निरीक्षक अशोक कडलग, पोलीस उपनिरीक्षक सचिन इंगळे यांच्यासह पोलिस कर्मचार्‍यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. तालुका मराठा क्रांती समितीचे सदस्यांसह शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रकांत पाटील, राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते अनंत देशमुख, ईश्वर रहाणे, बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, मराठा सेवा संघ जिल्हा प्रचार प्रमुख दिनेश कदम, संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष सचीन पाटील, माजी सभापती विलास धायडे, प्रफुल्ल पाटील, अ‍ॅड. सोपान दुट्टे, त्रिशुल मराठे, बाळु पाटील, सोपान मराठे, राहुल पाटील, दिपक साळुंखे, विनोद सोनवणे, शैलेश पाटील, अ‍ॅड. पवन चोपडे, राम पाटील, हभप रविंद्र हरणे, हभप उद्धव जुनारे, लिलाधर पाटील, जगदीश निकम, पप्पु मराठे, संदिप शिंदे, राहुल पाटील, विरेंद्र भोईटे, सुभाष पाटील, तानाजी पाटील, मुकेश महल्ले, मंगेश काटे, संदीप बागुल, सदाशिव पाटील, चंद्रकांत विटकरे, सुनिल पाटील, पंकज कोळी, मधु भोई, नितीन कांडेलकर, संदीप पाटील उपस्थित होते.

यावल येथे रस्त्यावर ठिय्या
यावल येथे मराठा समाजातर्फे रास्तारोको आंदोलन करण्यात आले. समाजबांधवांनी आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावरच ठाण मांडून वाहतूक अडविली. यामुळे काहीवेळ वाहतुक विस्कळीत झाली होती. याप्रसंगी अतुल पाटील, सुरेश पाटील, प्रा. मुकेश येवले, अ‍ॅड. निवृत्ती पाटील, अ‍ॅड. देवेंद्र बाविस्कर, सुरेश पाटील, राहुल पाटील, गजानन पाटील, यशवंत जासुद, दिनकर क्षिरसागर, अनिल पाटील, विकास मराठे आदी उपस्थित होते.