आरक्षणासाठी लढा दिल्यास अंमलबजावणीस मदत होणार

0

धनगर आरक्षण अंमलबजावणी करण्यासाठी सर्व संघटनांनी एकत्र येण्याचे आवाहन

पहूर । धनगर समाजाला डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी यापूर्वीच दिले आहे. परंतु राज्यकर्त्यांनी त्यांच्या फायद्यासाठी समजला गाजर दाखवून चालढकल केली असून यापुढे समाजातील सर्व संघटनांनी धनगर आरक्षण अंमलबजावणी करण्यासाठी आपापल्या परीने प्रयत्न करावे, असा सूर पहूर येथे आयोजित मेळाव्यात व्यक्त करण्यात आला. अध्यक्षस्थानी जिलसिंचन विभागाचे सेवानिवृत्त मुख्य अभियंता विजय पांढरे होते, त्यांनी शेंद्रिय शेतीचे महत्व पटवून देत आरोग्याची काळजी घेण्याचे, आवाहन उपस्थितांना केले.

समाजातील मुलांना शिक्षण द्या – अ‍ॅड.पाचपोळ
यावेळी विधान भवनातील सेवानिवृत्त अधिकारी अ‍ॅड. यांनी धनगर समाजाला रस्त्यावर उतरून आरक्षण मिळणार नसून न्यायालयीन लढा दिल्यास अंमलबजावणी होण्यास मदत होणार आहे. त्यासाठी आवश्यक पुरावे जमा आहेत ते न्यायालयासमोर सादर करणार आहोत. हा लढा योग्य असल्याचे मत अ‍ॅड. पाचपोळ यांनी व्यक्त केले. कुर्ला येथील महिला व बालविकास अधिकारी प्रताप पाटील यांनी समाजातील बर्‍याच लोकांना आरक्षण संदर्भात माहिती नसून याबाबत जनजागृती करून आपण आरक्षण मागत नसून मिळालेल्या आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी एकत्र येऊन लढा देण्याचे, आवाहन केले समाजातील लोकांनी शिक्षण महत्त्वाचे असून अगोदर मुलांना शिक्षण द्यावे असेही सांगितले.

यांची होती उपस्थिती
यावेळी प्रताप पाटील (केळवद), कैलास पाटील, धनगर समाज संघर्ष समितीचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख रामेश्वर पाटील यांनी मंत्री गिरीश महाजन यांनी मंगल कार्यालयासाठी १५ लाख व आ. चंदुलाल पटेल यांनी ५ लाख रुपये आमदार निधीतून दिले असूनही त्यांच्या नावाचा अभिनंदनाचा ठराव मांडला नसल्याने नाराजी व्यक्त केला. यावेळी समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.