आरक्षण पूर्ण लागू झाल्याशिवाय मेगाभरतीचा विचार करू नका

0

मराठा ठोक मोर्चाचे मुख्यमंत्र्यांना पत्र

ठाणे : मराठा आरक्षण लागू होत नाही तोपर्यंत मेगाभरती करु नका, अन्यथा पुन्हा 2014 सारखी परीस्थिती निर्माण होईल. तसे झाल्यास राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडेल. त्याला सरकार जबाबदार असेल असे पत्र मराठा ठोक मोर्चा समन्वयकांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे.

मराठा आरक्षण जाहीर झाल्यानंतर लगेच त्याला न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. या याचिकेवर झालेल्या सुनावणीनुसार मेगाभरती करुन घ्यावी. मात्र, निकाल राखीव ठेवावा, असे स्पष्ट झाले. यामुळे मेगाभरती झाली तरीही नेमके या भरतीत काय झाले? त्याचा निकाल काय? याबाबत मराठा तरुण अनभिज्ञ असतील. अशीच परिस्थिती 2014 सालीदेखील निर्माण झाली होती. 2014 ला एसईबीसी आरक्षण लागू झाले होते. त्यानुसार परीक्षा देऊन पास होऊनही अनेक मराठा तरुणांना कामावर रुजू करुन घेतले गेले नव्हते. त्यांच्या नियुक्त्या झाल्या नव्हत्या. हेच या मेगाभरती दरम्यानदेखील होईल. त्यामुळे सरकारने तत्काळ मेगाभरती थांबवावी आणि न्यायालयाचा निकाल स्पष्ट झाल्यावर मेगाभरती घ्यावी असे पत्रात म्हटले आहे