रावेर । तालुक्यात जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांमध्ये अनेक मातब्बरांना आरक्षणामुळे गोची झाली असून भाजपा, राष्ट्रवादी, काँग्रेस पक्षाच्या विद्यमान जिल्हा परिषद सदस्यांना निवडणुकीत कुठल्या गटात थांबावे लागतेय तर कुठे पत्नीला पुढे करायची वेळ आलेली आहे. यामुळे दिग्गज उमेदवारांनादेखील आपल्या आरक्षणानुसार मतदार संघाचा शोध घेवून पुढील निवडणुकीची रणनिती बदलावी लागत आहे. तालुक्यातील सहा पैकी चार गट भाजपाच्या ताब्यात आहे तर प्रत्येकी एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यात आहे. यंदा मात्र शिवसेना सुध्दा मोठ्या ताकदीने निवडणुकीच्या रिंगणात उतरत असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहे.
यंदाची निवडणूक शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी, काँग्रेस आघाडी अशी चौरंगी होण्याची दाट शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका व जिल्हा स्तरावरील नेते आघाडी करण्यासाठी प्रयत्नशिल आहे तर शिवसेना, भाजपा स्वतंत्र लढत असल्याने ग्रामीण मतदारांना कौल कोणाच्या गोटात देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
निंभोरा-तांदलवाडी गट
भाजपाच्या विद्यमान सदस्या पूनम दुर्गादास पाटील हे असून आता सर्वसाधारण असल्याने दुर्गादास पाटील, जिल्हा बँक संचालक नंदकिशोर महाजन, भाजपातर्फे तर राष्ट्रवादीकडून सुनिल कोंडे तर शिवसेनेकडून भास्कर पाटलांना उमेदवारी देवू शकते.
ऐनपूर-खिरवड गट
राष्ट्रवादीचे रमेश पाटील येथून प्रतिनिधीत्व करतात. पंरतु यंदा हा मतदार संघ ओबीसी महिला राखीव झाल्याने त्यांचीही गोची झाली आहे. त्यांना येथून त्यांच्या पत्नी बेबाबाई पाटील यांना उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्नशिल आहेे तर भाजपाकडून कल्पना पाटील, अलका चौधरी, कोकीळा पाटील, भारती पाटील, रंजना पाटील इच्छूक आहे तर शिवसेनेतर्फे सुलोचना पाटील, राष्ट्रवादीकडून रेखा चौधरी, उषा पाटील इच्छूक आहे.
पाल-केर्हाळा गट
विद्यमान शिक्षण सभापती सुरेश धनके येथून प्रतिनिधीत्व करतात परंतु ओबीसी महिलांसाठी हा गट राखीव झाल्याने धनके आखाड्याबाहेर होण्याची दाट शक्यता आहे. येथून भाजपाकडून येथून नंदा पाटील, शोभा पाटील तर शिवसेनेकडून मानसी पवार, काँग्रेसकडून तालुकाध्यक्ष अर्जुन जाधव, सुशिलाबाई जाधव, जनाबाई महाजन इच्छूक आहे.
वाघोदा-विवरा गट
विद्यमान सदस्या कोकीळा पाटील येथून प्रतिनिधीत्व करतात. परंतु आत हा गट अनुसुचित जमातीसाठी राखीव झाल्याने त्यांच्या आशेवर पाणी फिरले आहे. आता येथून हेमंत ठाकूर, अहमद तडवी, भाजपाकडून इच्छूक आहे तर शिवसेनेतर्फे मुबारक तडवी, राष्ट्रवादीतर्फे आत्माराम कोळी, काँग्रेसतर्फे गुलाब तडवी इच्छूक आहे.
चिनावल-खिरोदा गट
काँग्रेसच्या पुष्पा तायडे येथून प्रतिनिधीत्व करतात परंतु हा गट सर्वसाधारण महिलांसाठी झाल्याने येथून माधुरी नेमाडे, पुजा वायकोळे, तनुजा सरोदे, भाजपाकडून इच्छूक आहे तर काँग्रेसकडून संगिता महाजन, उज्वला भंगाळे इच्छूक आहे.
थोरगव्हाण-मस्कावद गट
शोभाबाई इंगळे सध्या प्रतिनिधीत्व करतात परंतु आता सर्वसाधारण गट झाल्याने येथून भाजपातर्फे शिवाजी पाटील, निलेश इंगळे, कैलास सरोदे इच्छूक आहे तर शिवसेनेतर्फे कमलाकर पाटील, दिपक राणे, नितीन नाले, कमलाकर पाटील, हेमराज पाटील इच्छूक आहे.
या विद्यमान सदस्यांची झाली पंचाईत
तालुक्यातील आरक्षणामुळे अनेक दिग्गज पुढार्यांची चांगलीच पंचाईत झाली आहे. त्यामध्ये पाल-केर्हाळे गटातील सुरेश धनके, ऐनपूर-खिरवड रमेश पाटील तर वाघोदा-विवरा गटातून कोकिळा पाटील यांची कमालीची पंचाईत झाली असून दिग्गज असल्याने तालुक्याच्या राजकारणात महत्वाचे व्यक्ती म्हणून त्यांना पाहिले जाते. परंतु आरक्षणामुळे कोणी थांबणे पसंत केले आहे तर कोणी गृहिणीला पुढे करण्याच्या तयारीत आहे.