आरजेडीने उघडला विजयाचा खाता

0

पटना: बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप-जेडीयूने जोरदार मुसंडी मारली आहे. सर्वच माध्यमांचे एक्झिट पोल फोल ठरताना दिसत आहेत. एक्झिट पोलमध्ये आरजेडी-कॉंग्रेसला बहुमत मिळेल असे दाखविण्यात आले होते. मात्र चित्र वेगळे आहे. एनडीए सत्तेत येतांना दिसत आहे. दरम्यान सकाळपासून मतमोजणी सुरु असताना एका जागेवर उमेदवार विजयी झाला आहे. विजयाचा खाता आरजेडीने उघडला आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार एक उमेदवार विजयी झाला आहे. अद्याप कोणत्याही पक्षाचा उमेदवार विजयी झालेला नाही, फक्त आघाडीवर आहे. २४२ जागांचे कल हाती आले आहे.

एनडीए १२९ जागांवर आघाडीवर आहे तर महागठबंधन १०३ जागांवर आघाडीवर आहे. तेजस्वी यादव यांचा मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न भंग होतांना दिसत आहे.