पटना: सध्या विविध प्रकरणात तुरुंगात असलेले माजी मंत्री लालू प्रसाद यादव यांची पुन्हा एकदा राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) पक्षाच्या प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. बिनविरोध निवड करण्यात आली आहे. सलग ११ व्या वेळेस ते पक्षाचे प्रमुख झाले आहे.
चारा घोटाळासहित रेल्वेतील अनेकगैरव्यवहारात ते सध्या तुरुंगात आहे. बिहारमधील राजकारणात त्यांना महत्त्वाचे स्थान आहे. सुरुवातील त्यांच्या पक्षाने नितीश कुमार यांच्यासोबत सरकार स्थापन केले होते. मात्र त्यानंतर त्यांच्या पक्षाने सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.