‘आरटीई’ची शासनस्तरावर आज निघणार पहिली सोडत

0

जळगाव : शिक्षण हक्क (आरटीई) कायद्यांतर्गत 25 टक्के जागांवर दिल्या जाणार्‍या शालेय प्रवेशाची पहिली सोडत आज दि.5 रोजी शासनस्तरावर होणार आहे. पहिल्या फेरीत साधारणत: निम्मे प्रवेश निश्चित होण्याची शक्यता असून त्यांच्या याद्या उद्या सायंकाळपर्यंत शिक्षण विभागाकडे येतील. तसेच ही प्रवेश प्रक्रिया तीन टप्प्यात जाहीर होणार असल्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी सांगितले.

आरटीईची सोडत आज शासनस्तरावर करण्यात येत असली तरी प्रत्येक जिल्ह्यातील ऑनलाईन अर्ज केलेल्या पाल्यांच्या प्रवेश निश्चितीचे मॅसेज मोबाईलवर आज सायंकाळपर्यंत प्राप्त होतील.पहिल्या टप्यात निम्मे प्रवेश होणार असून साधारणत: 1 किमीच्या आतील अंतर असलेल्या पाल्यांचे प्रवेश आज निश्चित होतील. त्यानंतर दोन किलोमीटर व तीन किमीच्या आतील अंतर असलेल्या शाळांची सोडत होणार आहे. प्रवेश प्रक्रिया 30 एप्रिलच्या आत पुर्ण केली जाणार असल्याचे शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी सांगितले.