जळगाव। आर्थिक दुर्बल घटकातील विद्याथ्र्यांना शाळांमध्ये आरटीई अंतर्गत 25 टक्के प्रवेशप्रक्रियेसाठी प्रवेश अर्ज मागविण्यात आले होते. त्यात पहिल्या सोडत मध्ये 3 हजार 537 ज़ागांपैकी फक्त 1 हज़ार 71 बालकांचे शाळांमध्ये प्रवेश झाले असुन 1465 पाल्यांच्या पालकांनी आपल्या पाल्यांचे प्रवेश आरटीई अंतर्गत घेतले नसल्याने तब्बल 1465 ज़ागांवर पाल्यांचा प्रवेश काल अंतिम मुदतीपर्यंत हुकला असल्याचे दिसुन आले आहे.
आरटीई अंतर्गत मोफत प्रवेशासाठी ज़िल्हा भरातीेल 232 शाळांमध्ये 3537 ज़ागांसाठी अर्ज़ मागविण्यात आले होते. त्यात पहिल्या सोडत मध्ये ज़ागांची सोडत काढण्यात आली होती. त्यात फक्त 1071 प्रवेश झाले आहे. आज़ शाळांमध्ये प्रवेश घेण्याचा अंतिम दिवस असतांना ज़ागा निम्मे पेक्षा भरल्या नसल्याचे समोर आले आहे.या आठवड्यात तीन ते चार दिवस सलग सुट्या आल्याने शासनाकडून पो्रवेशासाठी 2 दिवस मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र दोन दिवस मुदतवाढ देवून देखील पालकांनी या योज़नेचा लाभ घेतला नाही.