शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांचा विधानपरिषदेत इशारा
नागपूर-शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत राखीव प्रवेश खासगी शिक्षण संस्थानी नाकारल्यास अशा शाळांवर कारवाई करणार असल्याचे, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधानपरिषदेत सांगितले. शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत प्रवेश नाकारणाऱ्या खाजगी शाळा आणि दर्जा राखण्याच्या दृष्टीने नियमांची पूर्तता न करणाऱ्या अल्पसंख्याक शाळांविरोधात कडक धोरण अवलंबले असून अशा शाळांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही तावडे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
शिक्षण हक्क कायद्यानुसार गरीब आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांना २५ टक्के राखीव जागा असूनही ९१ खाजगी शाळांनी या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारल्या यासंदर्भात भाजपाचे भाई गिरकर यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता, या प्रश्नाला उत्तर देताना तावडे यांनी यातल्या बहुतेक शाळा अल्पसंख्याक दर्जाच्या असल्यामुळे त्या शाळांमध्ये शिक्षण हक्क कायद्याप्रमाणे राखीव जागा ठेवता येत नाहीत मात्र दोन शाळांना याबाबत नोटीस बजावण्यात आल्या असून यापुढे प्रवेश नाकारण्याची हिम्मत होणार नाही अशा पद्धतीने कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. राखीव जागांवर प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क सरकारकडून देण्यात येते या शुल्काची प्रतिपूर्ती केली असून माहिती न देणाऱ्या काही शाळांमुळे काही प्रमाणात प्रतिपूर्ती बाकी असल्याचे विनोद तावडे यांनी यावेळी सांगितले. या संदर्भात सर्व शंकांचे निरसन करण्याच्या दृष्टीने मुंबईत संबंधितांची बैठक घेण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
हे देखील वाचा
राज्यातल्या वरिष्ठ महाविद्यालयातल्या प्राध्यापकांची भरती प्रक्रिया सुरू करण्याची मागणी करणारा तारांकित प्रश्न शिक्षक सदस्य दत्तात्रय सावंत यांनी उपस्थित केला होता. वरिष्ठ महाविद्यालयातल्या प्राचार्य भरतीची बंदी उठवण्यात आली असून प्राध्यापक भर्तीवर असलेली बंदी लवकरच उठवण्यात येईल अशी माहिती विनोद तावडे यांनी या प्रश्नाला उत्तर देताना दिली. या महाविद्यालयांमध्ये तासानुसार शिकवणाऱ्या प्राध्यापकांना प्रति महिना १८ ते २० हजार रुपये वेतन मिळेल अशा पध्दतीची रचना करण्याबद्दल वित्त खात्याशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल असे शिक्षणमंत्र्यांनी सांगितले.
मुंबई विद्यापीठाचा कारभार आता सुरळीत
सरकारने उचललेल्या योग्य पावलांमुळे मुंबई विद्यापीठाचा कारभार आता सुरळीत सुरू आहे असे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी काँग्रेसचे संजय दत्त यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केले. गेल्या वर्षी मुंबई विद्यापीठाच्या परिक्षा आणि निकाला बाबत गोंधळ निर्माण झाला होता त्यानंतर मात्र राज्यपालांनी घेतलेल्या बैठकीनंतर सरकारने आवश्यक पावलं उचलली याचा परिणाम यंदाच्या परीक्षा सुरळीत झाल्या आणि निकालही निश्चित वेळेपेक्षा आधी लागले असे तावडे यांनी सांगितले. आता या विद्यापीठाची प्रतिष्ठा आणखी वाढणार आहे असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.