धुळे । बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणानुसार दुर्बल घटकातील बालकांना पहिल्या वर्गात (पूर्व प्राथमिक/इयत्ता पहिली) त्या वर्गाच्या विद्यार्थी क्षमतेच्या 25 टक्के मर्यादेपर्यंत प्रवेश देणे बंधनकारक आहे. त्यानुसार 2018- 2019 या वर्षाकरीता 25 टक्के प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे, असे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी मोहन देसले यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे. आरटीई प्रवेशाचा एकूण 108 दिवसांचा हा कार्यक्रम आहे.
वेळापत्रक असे
आरटीई प्रवेश पात्र शाळांची नोंदणी- 3 ते 20 जानेवारी , नोंदणी केलेल्या शाळांची पडताळणी 22 व 23 जानेवारी , पालकांनी ऑनलाइन प्रवेश अर्ज भरणे 24 जानेवारी ते 10 फेब्रुवारी , पहिली सोडत 12 व 13 फेब्रुवारी , लॉटरीद्वारा प्रवेश मिळालेल्या पालकांनी विहित मुदतीत शाळेत जावून प्रवेश निश्चिती 14 ते 22 फेब्रुवारी , प्रवेशपात्र शाळांमधील रिक्त पदांची संख्या ऑनलाइन दर्शविणे- 23 व 24 फेब्रुवारी, दुसरी सोडत 26 व 27 फेब्रुवारी काढली जाणार आहे. लॉटरीद्वारा प्रवेश मिळालेल्या पालकांनी विहित मुदतीत शाळेत जावून प्रवेश निश्चिती करणे 28 फेब्रुवारी ते 5 मार्च, पात्र शाळांमधील रिक्त पदांची संख्या ऑनलाइन दर्शविणे- 6 व 7 मार्च , तिसरी सोडत 8 व 9 मार्च. लॉटरीद्वारा प्रवेश मिळालेल्या पालकांनी विहित मुदतीत शाळेत जावून प्रवेश निश्चिती करणे 10 ते 16 मार्च , प्रवेश पात्र शाळांमधील रिक्त पदांची संख्या ऑनलाइन दर्शविणे- 17 ते 19 मार्च, चौथी सोडत 20 व 21 मार्च, लॉटरीद्वारा प्रवेश मिळालेल्या पालकांनी विहित मुदतीत शाळेत जावून प्रवेश निश्चिती करणे 22 ते 28 मार्च , पात्र शाळांमधील रिक्त पदांची संख्या ऑनलाइन 31 मार्च ते 2 एप्रिलला प्रसिध्द करण्यात येणार आहे.
लॉटरी पध्दतींने मिळणार प्रवेश
पाचवी सोडत 3 व 4 एप्रिल, लॉटरीद्वारा प्रवेश मिळालेल्या पालकांनी विहित मुदतीत शाळेत जावून प्रवेश निश्चिती करणे 5 ते 11 एप्रिल , प्रवेश पात्र शाळांमधील रिक्त पदांची संख्या ऑनलाइन दर्शविणे 12 व 13 एप्रिल , सहावी सोडत काढणे- 16 व 17 एप्रिल , लॉटरीद्वारा प्रवेश मिळालेल्या पालकांनी विहित मुदतीत शाळेत जावून प्रवेश निश्चिती करणे- 18 ते 24 एप्रिल , प्रवेशपात्र शाळांमधील रिक्त पदांची संख्या ऑनलाइन 25 व 26 एप्रिल येणार आहे.