‘आरटीई’ साठी 1 लाख 81 हजार अर्ज

0


अर्ज दाखल करण्याची मुदत शुक्रवारी संपणार

पुणे : आरटीईच्या 25 टक्के प्रवेशासाठी राज्यातून 1 लाख 81 हजार अर्जांची ऑनलाइन नोंदणी करण्यात आली आहे. येत्या शुक्रवारी प्रवेशासाठी अर्ज करण्याची मुदत संपणार आहे. राज्याच्या विविध जिल्ह्यांत आरटीई प्रवेशासाठी 5 मार्चपासून ऑनलाइन अर्ज नोंदणीला सुरुवात झाली आहे. एकूण 9 हजार 194 शाळांमध्ये 1 लाख 16 हजार 782 प्रवेशाच्या जागा दर्शविण्यात आल्या आहेत. आतापर्यंत पालकांकडून उपलब्ध जागांपेक्षा जास्त अर्ज दाखल झाले आहेत. पुण्यात 16 हजार 619 जागांसाठी सर्वाधिक 42 हजार 263 तर सिंधुदुर्गमध्ये 353 जागांसाठी सर्वात कमी 308 एवढे अर्ज दाखल झाले आहेत.

अधिकार्‍यांमार्फत अर्जाची छाननी

ऑनलाइन व मोबाइल अ‍ॅपद्वारे अर्ज नोंदणीसाठी पोर्टलवर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यात ऑनलाइनद्वारे 1 लाख 81 हजार 167 तर मोबाइल अ‍ॅपद्वारे केवळ 465 अर्जांची नोंदणी झाली आहे. पालकांनी दाखल केलेल्या अर्जांची व कागदपत्रांची छाननीही अधिकार्‍यांमार्फत करण्यात येणार आहे. छाननीत पात्र ठरलेल्या अर्जांची 22 मार्चनंतर प्रवेशासाठी सोडत काढण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. सोडतीत नंबर आलेल्यांना जूनपासून शाळांमध्ये प्रवेश दिला जाणार आहे.