‘आरटीओ’ला साडेचार कोटी रुपयांचा महसूल!

0

पिंपरी-चिंचवड : गुढीपाडवा म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त. यामध्ये सोने-चांदीचे दागिने, घर तसेच वाहन खरेदीसाठी हा शुभ मुहूर्त मानला जातो. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर वाहन खरेदी करण्याला यंदाही नागरिकांची मोठी पसंती दर्शवली. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर खरेदी केलेल्या नवीन गाड्यांच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवड ‘आरटीओ’ला तब्बल साडेचार कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी सायंकाळी पाच वाजेपर्यंत एक हजार 479 जणांनी नवीन वाहन खरेदी केल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातून मिळाली.

दोन दिवसात सव्वाचार कोटींचा महसूल
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर दुचाकी व चारचाकी वाहने खरेदीसाठी नागरिकांकडून पसंती दिली जाते. म्हणून सुट्टीच्या दिवशीही उप प्रादेशिक परिवहन कार्रालर सुरू ठेवण्रात आले होते. पाडव्याच्या दिवशी 880 वाहनांची विक्री झाली. रामधून उप प्रादेशिक परिवहन विभागाला 2 कोटी 9 लाख 28 हजार 429 रुपरांचा महसूल मिळाला आहे. पाडव्राच्या दिवशी 743 दुचाकी आणि 96 चारचाकी वाहनांनी विक्री झाली. तसेच 41 टुरिस्ट वाहनांचाही समावेश आहे. रा दोन दिवसांमध्ये आरटीओला 4 कोटी 34 लाख 17 हजार 504 रुपरांचा महसूल गोळा झाला आहे. तर दि. 27 रोजी एका दिवसात 146 चारचाकी, 394 दुचाकी आणि 58 टुरिस्ट वाहनांची विक्री झाली. मुहूर्तासाठी म्हणून 599 वाहनांची नागरिकांनी खरेदी केली. रामधून आरटीओला 2 कोटी 24 लाख 89 हजार 15 रुपरांचा महसूल मिळाला.