आरटी-पीसीआर चाचणी चारशे रुपयात करा; सुप्रीम कोर्टाची केंद्र, राज्याला नोटीस

0

नवी दिल्ली: कोरोनाचे निदान होण्यासाठी चाचणी करावी लागते, त्यासाठी आरटी-पीसीआर, antigen चाचणी केली जात आहे. आरटी-पीसीआर चाचणी antigen चाचणीपेक्षा अधिक खात्रीलायक आहे. दरम्यान आरटी-पीसीआर चाचणीचे दर देशभरात ४०० रुपये करण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारसह राज्य सरकारांना नोटीस पाठवून उत्तर मागितले आहे. आरटी-पीसीआर चाचणीचे दर देशभरात ४०० रुपये करण्यात यावे अशी मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवरील आज मंगळवारी सुनावणी झाली. केंद्र व राज्यांना नोटीस बजावली दोन आठवड्यात उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.

करोनाच्या आरटी-पीसीआर चाचणीच्या दराबाबत वकील असलेल्या अजय अग्रवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. “आरटी-पीसीआर चाचणीचे दर देशभरात वेगवेगळे आहेत. देशात एकच दर असायला हवा. देशभरात आरटी पीसीआर चाचणीचे दर ४०० रुपये निश्चित करायला हवे. त्यामुळे करोना चाचण्यांमध्ये वाढ होऊन लोकांनाही फायदा होईल,” असं त्यांनी याचिकेत म्हटलं आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या अध्यक्षतेखाली खंठपीठासमोर सुनावणी झाली.