धुळे । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटबंदी जाहीर केली. त्यानंतर जनतेला थोडासा त्रास सहन करावा लागला परंतू डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेत दर दहा वर्षांनी चलनी नोटा बदलणे आवश्यक असल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या नोटबंदीला पाठींबा असल्याचे रिपब्लिकन पक्षाच्यावतीने जाहीर करण्यात आले आहे.
सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. या पत्रपरिषदेला संजय पगारे, काकाजी खंबाळकर, साळुंके यांच्यासह रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. आरपीआयतर्फे 8 नोव्हेंबर रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ राज्यभर मोदींच्या सत्कारार्थ कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. 8 नोव्हेंबर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे ’व्हाईट मनी डे’ म्हणून साजरा केला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.