सन्मानपत्र व रोप दिले भेट
लोणावळा : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्यावतीने शहरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ व शालेय वस्तूंचे वाटप कार्यक्रम नुकताच पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आली. इयत्ता 10वी, 12 वी व पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना यावेळी सन्मान पत्र व एक विद्यार्थी एक वृक्ष या संकल्पनेतुन वृक्षांची रोपे देण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आरपीआय जिल्हाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी ज्ञानेश्वर शिवथरे, आरपीआय तालुका अध्यक्ष अशोक गायकवाड, शहराध्यक्ष कमलशील म्हस्के, जेष्ठ नेते गायकवाड गुरुजी, जिल्हा सरचिटणीस गणेश गायकवाड, तालुका सरचिटणीस नारायण भालेराव, नगरसेवक दिलीप दामोदरे, नगरसेविका वृंदा गणात्रा, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लक्ष प्राप्त करण्यासाठी मेहनत घ्यावी
यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्ष सुर्यकांत वाघमारे म्हणाले की, लोणावळ्यातील विद्यार्थ्यांनी लोकसेवा परिक्षा उत्तीर्ण केल्यास त्यांचा सत्कार रेल्वे ग्राउंड सारख्या मोठ्या मैदानात भव्यदिव्य रितीने करण्यात येईल. विद्यार्थ्यांनी आपले लक्ष प्राप्त करण्यासाठी खूप प्रयत्न करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी आपले लक्ष साध्य करण्यासाठी खूप मेहनत घेणे गरजेचे आहे.