तळेगाव : स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला डोकलाम प्रकरणावरून चीनचा निषेध करण्यासाठी मावळ तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पवनानगर शाखेच्या वतीने पवनानगर बाजारपेठेमध्ये चीनी मालाची होळी करण्यात आली.
भारत माता की जय व स्वदेशीच्या घोषणा देऊन शहीद जवान अमर रहे! या घोषणा देण्यात आल्या. यावेळी बोलताना आरपीआय सरचिटणीस लक्ष्मण भालेराव म्हणाले की, चीन हा भारतावर दबावशाही करत आहे. देशाच्या सैनिकांना जर पाठबळ द्यायचे असेल तर भारतातील नागरिकांनी शंभर टक्के चीनी मालाचा वापर बंद करून चीनला होणारी आर्थिक रसद थांबली पाहिजे.
पहिले पाऊल आरपीआयने उचलले असून यापुढे देखील चीनी मालाच्या वापराविरोधात यापुढे जनजागृती करण्यात येणार आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी आरपीआय सरचिटणीस लक्ष्मण भालेराव, खंडू वाघमारे, संपर्क प्रमुख सिद्धार्थ भालेराव, देवानंद भालेराव, राजेंद्र ओव्हाळ, उत्तम चव्हाण, विलास भालेराव रमेश घोडके, प्रतीक भालेराव, विकी शेलार, प्रकाश घोडके, अर्जुन घोडके, मोहीत चव्हाण, प्रकाश भालेराव, विकी शेलार, हमीद शेख तसेच नागरिक उपस्थित होते.