जळगाव । औरंगाबाद येथील डॉ.बाबााहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा 23 वा नामविस्तार दिन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) महिला आघाडी व महानगरतर्फे साजरा करण्यात आला.
महिला आघाडीच्यावतीने शांती नारायण नगर येथील कार्यालयात नामांतर दिवस साजरा करण्यात आला. तसेच नामांतर चळवळीत शहीद झालेले जनार्दन मवाळे, पोचीराम कांबळे, सुषमा तायडे यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी सुरेश अडकमोल, अनिल अडकमोल, दिपक सपकाळे, भरत मोरे, यशवंत घोडेस्वार, प्रताप बनसोडे, रमाताई ढिवरे, नितीन आसमार, अशोक पारधे, मिलींद सोनवणे, सागर सपकाळे, सुरेखा बेडसे, शोभा खैरनार, गोधाबाई राठोड, संगीता वंजारी, लता वाघ भिमराव सोनवणे, जगदिश शिरसाळे, भिकन ठाकरे, पुनम जोहरे, सागर गायकवाड, किरण अडकमोल, बापू धामणे, पृथ्वी गायकवाड, मुकेश टिल्लोर आदी उपस्थित होते.