आरपीआयतर्फे रविवारी राज्यव्यापी अधिवेशन

0

पुणे :- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) च्या वतीने 27 मे रोजी आयोजित राज्यव्यापी अधिवेशन पुण्यातील एसएसपीएमएसच्या मैदानावर होणार आहे. याठिकाणी भव्य मंडप उभारला जात असून, या अधिवेशनात राज्यभरातून लाखो रिपब्लिकन कार्यकतें पुण्यात येणार आहेत. रविवारी दुपारी चार वाजता केंद्रीय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

यांची असणार उपस्थिती
या अधिवेशनाचे उद्घाटन केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते होणार असून या अधिवेशनाला पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, राज्यमंत्री दिलीप कांबळे, पुण्याचे खासदार अनिल शिरोळे, संजय काकडे, महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे आदी उपस्थित राहणार आहेत.

अधिवेशनात येणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी सोयीसोविधा उपलब्ध
याबाबत रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र सचिव बाळासाहेब जानराव म्हणाले, आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होत असलेले हे अधिवेशन यशस्वी करण्यासाठी रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कंबर कसली असून शहरातील विविध भागात कोपरा सभा बैठका घेऊन अधिवेशनाबाबत जागृती केली जात आहे. लोकांच्या सोयीसाठी विभागावर बस व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी आरोग्य सुविधा, भोजनव्यवस्था, स्वच्छतागृहे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. कोणत्याही कार्यकर्त्याची गैरसोय होऊ नये, यासाठी पुरेपूर काळजी घेतली जात आहे.