आरपीआय आठवले गटातर्फे कारवाईची मागणी

0

जळगाव । पूर्णा जिल्हा परभणी येथे 14 एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त निघालेल्या मिरवणूकीवर काही समाज कंटकांनी भ्याड हल्ला केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 126व्या जयंती दिनी दर वर्षांप्रमाणे पूर्णा येथे गावाच्या प्रमुख रस्त्यांवरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढत असतांना काही समाज कंटकांनी मिरवणूकीवर भ्याड प्रकारे हल्ला केला. त्या हल्ल्यामध्ये दोनशे जण जखमी झाले तर आठ जण गंभीर आहे. तर उपचारादरम्यान, एकाचा मृत्यू झाला आहे. मृत्यूस कारणीभूत असलेल्या समाज कंटकांचा शोध घेवून त्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्याच्यावर अ‍ॅट्रोसिटी कायद्यांतर्गत कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आरपीआयने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.