आरपीआय राज्य वाहतूक आघाडीच्या अध्यक्षपदी अजीज शेख

0

पिंपरी : रिपब्लिकन पक्षाच्या महाराष्ट्र राज्य वाहतूक आघाडीच्या अध्यक्षपदी अजीज शेख यांची निवड करण्यात आली आहे. रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या सहीने त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले. पक्षाच्या माध्यमातून सामाजिक, राजकीय व मानव अधिकार क्षेत्रातील योगदान, पक्षाच्या व्यापक ध्येय धोरणांचा प्रसार आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असणारा रिपब्लिकन पक्ष उभा करण्यात यावा. समाजहिताचे कार्य पक्षाच्या माध्यमातून व्हावे, याकरीता निवड करण्यात आली असल्याचे, रामदास आठवले यांनी नियुक्ती पत्रात नमूद केले आहे.